esakal | भोजपूरी गाण्यांमधील अश्लिललेचा मुद्दा खासदार रविकिशन संसदेत मांडणार
sakal

बोलून बातमी शोधा

Ravikishan raise question against the vulgarity in Bhojpuri song

भोजपूरी भाषा ही एक हजार वर्ष जूनी आहे. आणि कोट्यवधी लोकं ती भाषा बोलतात. मात्र आता या भाषांमध्ये मोठ्या प्रमाणावर अश्लील, असभ्य भाषा, शब्दांचा वापर केला जात आहे. यामुळे भोजपूरी भाषेची प्रतिमा मलिन होत आहे. 

भोजपूरी गाण्यांमधील अश्लिललेचा मुद्दा खासदार रविकिशन संसदेत मांडणार

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई -भोजपूरी गाण्यांमधील काही शब्द, तसेच त्यातील भाव हा अश्लिलतेकडे झुकणारा असल्याने त्याविरोधात काही ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी तिथल्या काही कलावंतांनी केली होती. यामुळे पूर्ण भोजपूरी चित्रपटसृष्टी बदनाम होत असल्याचेही त्यांनी म्हटले होते. यावर आता अभिनेता आणि खासदार रविकिशन यांनी हा मुद्दा संसदेत मांडणार असल्याचे सांगितले आहे. याशिवाय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे सेंसॉर बोर्डाची मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

मागील दोन दिवसांपूर्वी भाजपचे खासदार रवि किशन यांनी भोजपूरी गीतातील ‘अश्लीलतेचा' मुद्दा सभागृहात मांडणार असल्याचे सांगितले. अशा गीतांविरोधात कडक कायद्याची निर्मिती करण्य़ात यावी असेही त्यांनी म्हटले आहे. याविषयी अधिक माहिती देताना रवि किशन म्हणाले, भोजपूरी भाषा ही एक हजार वर्ष जूनी आहे. आणि कोट्यवधी लोकं ती भाषा बोलतात. मात्र आता या भाषांमध्ये मोठ्या प्रमाणावर अश्लील, असभ्य भाषा, शब्दांचा वापर केला जात आहे. यामुळे भोजपूरी भाषेची प्रतिमा मलिन होत आहे. 

सासू सुनेचे प्रेम ठरले लव जिहादचे कारण; तनिष्कच्या ''त्या'' जाहिरातीवर बंदी
 याप्रकरणावर संसदेत भोजपूरी गाण्यांसंदर्भात संसदेत मुद्दा मांडणार आहे. यासाठी मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना साकडे घालणार आहे. विशेषत; भोजपूरी भाषेसाठी एक वेगळे सेसाँर बोर्ड तयार करण्यासाठीची मागणीही त्यांच्याकडे केली जाणार आहे.  आता गोरखपूर हे पुढील काही दिवसांत चित्रिकरणासाठी महत्वाचे ठिकाण होणार आहे. खरे तर हे एक स्वप्नासारखे असून याचा मला विशेष आनंद वाटतो. भोजपूरी चित्रपटांसाठी ही एक महत्वाची संधी ठरणार आहे. त्याचा फायदा निर्माते आणि दिग्दर्शकांनी घेण्याची गरज आहे. याठिकाणी एका वेब सीरिजचे 60 भाग चित्रित केले जाणार आहेत. 

मला लग्नचं नाही करायचं, कुणाला काही प्रॉब्लेम ?; सलमानचा बिग बॉसमधल्या स्पर्धकांना प्रश्न

यापूर्वी बॉलीवूडमधल्या ड्रग्ज प्रकरणावर रविकिशन यांनी संसदेत आवाज उठविला होता. तेव्हा त्यांना अनेकांच्या टीकेला सामोरे जावे लागल्याचे दिसून आले. तर संसदेत त्यावेळी जया बच्चन यांच्याबरोबर झालेला वाद सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला होता. 

आता कळलं जगासमोर अपमान केल्यावर कसं वाटतं? ; कंगनाचा याचिका दाखल करणा-यांवर पलटवार