esakal | राम कपूरही अलिशान गाडीचा मालक; किंमत ऐकून व्हाल थक्क
sakal

बोलून बातमी शोधा

ram kapoor

राम कपूरही अलिशान गाडीचा मालक; किंमत ऐकून व्हाल थक्क

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

हिंदी मालिकेमधील प्रसिद्ध अभिनेता राम कपूरने (Ram Kapoor) नुकतीच एक लक्झरी गाडी घेतली आहे. या गाडीच्या कंपनीने त्यांच्या सोशल मीडिया अकांउंटवर राम आणि त्याच्या कुटुंबाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये रामची ही निळ्या रंगाची आलिशान गाडी दिसत आहे. (Ram Kapoor buys new Porsche sports car pvk99)

राम कपूर यांनी नुकतीच 'पोर्श 911' ही गाडी घेतली आहे. या गाडीची किंमत 1.83 करोड आहे. पोर्श या कंपनीने राम यांचे गाडीसोबतचे फोटो शेअर करून त्याला कॅप्शन दिले, 'ही राम कपूर यांची आलिशान गाडी. मुंबई येथील आमच्या शोरूममधून ही गाडी राम यांना देण्यात आली. या गाडीमधून ते आनंदी आणि सुखी प्रवास करतील अशी आशा आहे.' या फोटोमध्ये राम यांच्यासोबत पोर्श कंपनीचे काही कर्मचारी दिसत आहे. पोर्श कंपनीने शेअर केलेल्या या पोस्टला कमेंट करून रामच्या चाहत्यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

हेही वाचा: एवढा मोठा अभिनेता, कारचा टॅक्स चूकवला, विजयला कोर्टानं फटकारलं

राम कपूर यांच्या उडान, थप्पड, बिग बूल या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आले. 'कसमसे' आणि 'बडे अच्छे लगते है' या मालिकेमधील राम यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. 2019 मध्ये हिंदूस्थान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये रामने त्याच्या हिंदी मालिकांमुळे मिळालेल्या प्रसिद्धीबद्दल सांगितले होते. तेव्हा तो म्हणाले, 'मी काही सलमान खान शाहरूख खानसारखा प्रसिद्ध अभिनेता नाही. पण मी मालिकांमधून एवढी लोकप्रियता मिळवली आहे की आज प्रत्येक जण मला ओळकतो. मला पसंती देणारे माझे काही मोजके आणि प्रामाणिक चाहते आहे. जे माझ्याकामाबद्दल मला प्रामाणिकपणे सांगतात. मला वाटतं की मालिकांमध्ये काम करा किंवा चित्रपटांमध्ये जर तुमचे काम चांगले असेल तर तुम्हाला प्रेक्षकांची पसंती मिळतेच.'

हेही वाचा: Mimi trailer: 'सरोगेट मदर'ची अनपेक्षित कहाणी

loading image