कसं करणार आलिया-रणबीर बाळाचं वेलकम? अभिनेत्याने पूर्ण लिस्टच वाचून दाखवली Ranbir Kapoor | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ranbir Kapoor REVEALS he has started building a nursery for his soon-to-be-born baby with Alia Bhatt, many welcome plans for baby

कसं करणार आलिया-रणबीर बाळाचं वेलकम? अभिनेत्याने पूर्ण लिस्टच वाचून दाखवली

रणबीर कपूर(Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट(Alia Bhatt) लवकरच आई-वडीलांच्या भूमिकेत जाणार आहेत,आणि अर्थातच हे दोघेही यासाठी भरपूर उत्सुक आहेत. दोघांनी आपल्या पहिल्या बाळाच्या आगमनाची तयारी देखील करायला सुरुवात केली आहे. अशातच रणबीर कपूर जरा जास्तच वडीलांच्या भूमिकेत जाऊन विचार करायला लागला आहे. रणबीरने एका रेडिओ चॅट शो मध्ये खुप मोकळेपणाने संवाद साधला.(Ranbir Kapoor REVEALS he has started building a nursery for his soon-to-be-born baby with Alia Bhatt, many welcome plans for baby)

हेही वाचा: The Kapil Sharma Show चे टी.व्ही वर कमबॅक, 'या' दिवशी दिसणार पहिला एपिसोड

रणबीर त्या शो मध्ये म्हणाला,''सध्या मी माझ्या पत्नीसोबत येणाऱ्या आनंदी दिवसांची स्वप्न पहात आहे. प्रत्येक दिवस आम्ही कसा चांगला घालवता येईल याकडे अधिक लक्ष देतो. नव्यानं आई-वडील बनणारे पालक जसे लोकांच्या अनुभवांमधून शिकतात,उत्साह वाढवतात तसे आम्ही देखील इतरांच्या अनुभवाच्या गोष्टी वाचायला,अनुभवयाला सुरुवात केली आहे. आम्ही आमच्या बाळासाठी घरात नर्सरी देखील बनवायला घेतली आहे. आम्ही खूप मजेदार गोष्टींचा आनंद घेत आहोत या माध्यमातून. आमच्या बाळाची वाट पाहणं,त्याच्या आगमनाचा उत्साह, अधीरता,चिंता-काळजी या सगळ्या गोष्टी कोणत्याही दुसऱ्या गोष्टीपेक्षा वेगळ्या आहेत. ते अनुभवण्याचा आनंद काही औरच आहे. याची तुलनाच कशाशी होऊ शकत नाही. आम्ही येणारा प्रत्येक दिवस जगत आहोत,जो आम्हाला आमच्या बाळाच्या अधिक जवळ घेऊन जात आहे''.

हेही वाचा: 'मुलांना जन्म देऊ नका',असं का म्हणाली पूनम पांडे? व्हायरल व्हिडीओची चर्चा

याआधी एका मुलाखतीत रणबीर कपूरने हिंट दिली होती की,त्यांना जुळी मुलं होणार आहेत. मुलाखतीत त्याला त्यावेळी दोन खऱ्या आणि एक खोटी गोष्ट बोलायला सांगितली होती. आणि यामध्ये त्याला खोटं काय बोलतोय याचा खुलासा करायचा नव्हता. उत्तर देताना रणबीरने सांगितलं, ''मला जुळी मुलं होणार आहेत. मी खूप मोठ्या ऐतिहासिक सिनेमाशी जोडला जातोय. आणि मी कामातून मोठा ब्रेक घेणार आहे''. यानंतर चाहते उत्तराचा गुंता सोडवताना चिंतेत पडलेले दिसले. आणि रणबीरच्या बोलण्याचे वेगवेगळे अर्थ लावले जाऊ लागले. त्यानंतर रणबीरने आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढत उगाचच गोंधळ माजवू नका असं देखील म्हटलं होतं.

हेही वाचा: Arjun Kapoor ने करोडोंना विकला मुंबईतला फ्लॅट, या इमारतीत सगळेच Celebrity

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरने १४ एप्रिल २०२२ रोजी लग्नगाठ बांधली होती. या लग्नात दोघांचे कुटुंबिय आणि जवळचा मित्रपरिवार सामिल झाला होता. यानंतर २७ जून रोजी आलियाने आपल्या प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. आलियाने इन्स्टाग्रामवर सोनोग्राफी करतानाचा एक फोटो शेअर केला होता. तिच्यासोबत रणबीर कपूर देखील त्या फोटोत पाठमोरा होता.

हेही वाचा: साऊथच्या गायिकेवर भडकले लोक, देवाच्या कीर्तनाचं केलं रोमॅंटिक व्हर्जन

रणबीर कपूर लवकरच 'शमशेरा' सिनेमाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर कमबॅक करत आहे. तब्बल चार वर्षांनी रणबीरचा सिनेमा मोठ्या पडद्यावर रिलीज होत आहे. या सिनेमात त्याच्यासोबत वाणी कपूर आण संजय दत्त देखील आहे. तर दुसरीकडे स्वतःची पत्नी आलिया भट्टसोबत तो 'ब्रह्मास्त्र' सिनेमातूनही आपल्याला दिसणार आहे. आलिया-रणबीर पहिल्यांदाच एकत्र या सिनेमाच्या माध्यमातून स्कीन शेअर करताना दिसणार आहेत.

Web Title: Ranbir Kapoor Reveals He Has Started Building A Nursery For His Soon To Be Born Baby With Alia Bhatt Many Welcome Plans For

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..