Ranveer Nude Mims: अमिताभ यांनी घागरा घातल्यावर, रणबीरनं कपडेच घालणं सोडलं! |Ranveer extreme bold Photoshoot Mims viral | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ranveer Nude Mims news

Ranveer Nude Mims: अमिताभ यांनी घागरा घातल्यावर, रणबीरनं कपडेच घालणं सोडलं!

Ranveer Bold Look News: बॉलीवूडचा अतरंगी अभिनेता रणवीर सिंग त्याच्या न्युड फोटोमुळे चर्चेत आला आहे. त्यावरुन त्याला सोशल मीडियावरुन ट्रोल करण्यात आले आहे. त्या ट्रोल करण्याचे आणखी एक कारण म्हणजे दोन (Bollywood Actor) दिवसांपूर्वी बिग बी अमिताभ बच्चन यांनी घागरा परिधान केला होता. त्यांच्या त्या फोटोवर तुम्ही घागरा घातल्यावर रणवीर काय परिधान करणार असा सवाल नेटकऱ्यांनी अमिताभ यांना विचारला होता. काल रात्री उशिरा (Bollywood Big B Amitabh Bachchan) रणबीरनं केलेलं न्युड फोटोशुट मात्र नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतना दिसत आहे. त्यावरुन सोशल मीडियावर रणवीरवर सडकून टीका केली जात आहे.

सोशल मीडियावर रणवीरचे जे फोटो समोर आले आहेत ते पाहून चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. त्याच्या एका चाहत्यानं यानं तर कहरच केला. अमिताभ यांनी घागरा परिधान केल्यानंतर हा चक्क न्युडच झाला आहे. याला काय म्हणावं अशाप्रकारची प्रतिक्रिया दिली आहे. दुसरीकडे अभिनेत्री दीपिकावरुनही रणवीरला ट्रोल करण्यात आले आहे. दीपिकाची प्रायव्हेट प्रॉपर्टी अशाप्रकारे सार्वजनिक झाली, रणबीरनं संयम ठेवण्याची गरज अशा आशयाच्या प्रतिक्रियाही लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

रणवीर नेहमीच सोशल मीडियावर ट्रेडिंग असणारा अभिनेता आहे. आता तर न्युड (Ranveer Bold Photoshoot) फोटोग्राफीनं त्याला चर्चेत आणलं आहे. करण जोहरच्या कार्यक्रमात त्यानं केलेल्या वेगवेगळ्या वक्तव्यानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याची पत्नी अभिनेत्री दीपिकाला देखील त्याच्या अशाप्रकारच्या वागण्याचा अनेकदा मनस्ताप झाला आहे. तिनं काही मुलाखतींमध्ये रणवीरच्या अतिउत्साहाला आवरणं कठीण असल्याचे सांगितले होते.

बॉलीवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत असणारा अभिनेता म्हणून ज्याचे नाव घेतले जाते त्या रणवीरच्या न्युड फोटोग्राफीनं खळबळ उडवून दिली आहे. आतापर्यत या फोटोंना लाखो लाईक्स, हजारो कमेंटस आल्या आहे.रणवीरनं एका मॅगझीनसाठी अशा प्रकारचे फोटोशुट केल्याचे समोर आले आहे. मात्र यावेळी त्यानं जे फोटोशुट केलं आहे ते भलतेच बोल्ड आहे. रणवीर अशाप्रकारचे फोटोशुट करु शकतो यावर त्याच्या चाहत्यांना विश्वास बसलेला नाही.

Ranveer Singh Memes viral

Ranveer Singh Memes viral

दुसरीकडे काही नेटकऱ्यांनी अमिताभ यांनी रणवीर यांची तुलना करण्यास सुरुवात केली आहे. अमिताभ यांच्या घागरा लूक्सवर त्यांना देखील नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. अशावेळी रणवीरच्या दिगंबर अवतारानं अमिताभ यांनी घागरा घातल्यानंतर रणवीरनं कपडेच घालायचे सोडून दिले की काय अशा प्रकारच्या प्रतिक्रियाही सोशल मीडियावरुन व्हायरल होत आहे.

Ranveer Singh Memes viral

Ranveer Singh Memes viral