'आमच्या घरातला हसरा चेहरा गेला!' अभिनेता रवि किशनवर पुन्हा एकदा काळाचा घाला |Ravi Kishan brother Ram Kishan Death | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ravi Kishan bollywood celebrity brother ram kishan shukla

Ram Kishan Death : 'आमच्या घरातला हसरा चेहरा गेला!' अभिनेता रवि किशनवर पुन्हा एकदा काळाचा घाला

Ravi Kishan bollywood celebrity brother ram kishan shukla : मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेता आणि खासदार रवि किशनवर पुन्हा एकदा दु:खाचा डोंगर कोसळल्याचे दिसून आले आहे. रवि किशनच्या मोठ्या भावाचे राम किशन शुक्ला यांचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. ते ५३ वर्षांचे होते. हदयविकाराच्या धक्क्यानं त्यांचा मृत्यु झाल्याची बातमी सुत्रांनी दिली आहे.

रवि किशननं सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर करुन याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. त्याच्यावरील या प्रसंगानं चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याच्या आणि कुटूंबाप्रती सहानुभूती व्यक्त केली आहे. मुंबईतील एका रुग्णालयात त्यांच्या भावाचे निधन झाले असून रवि किशनवर पुन्हा एकदा काळानं घाला घातला आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या एका मोठ्या भावाचे निधन झाले होते.

Also Read - ढोलेरा- ग्रीनफिल्ड सिटी आणि महाप्रचंड औद्योगिक हब...

गेल्या काही दिवसांपासून रवि किशनच्या मोठ्या भावाच्या छातीत दुखू लागले होते. त्यानंतर त्यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखलही करण्यात आले होते. मात्र त्याचवेळी त्यांना हदयविकाराचा धक्का बसल्यानं त्यात त्यांचा मृत्यु झाल्याची बातमी समोर आली आहे. रवि किशन यांना एकुण तीन भावंडं, त्यातील दोन भावांचे निधन झाले आहे.

रविनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, मला ही गोष्ट सांगताना खूप वाईट वाटत आहे की, माझे मोठे बंधू राम किशन शुक्ला यांचे हदयविकाराच्या धक्क्यानं निधन झाले आहे. ओम शांती, शांती ओम...या पोस्टनंतर भोजपूरी इंडस्ट्रीतील अनेक मान्यवरांनी रविप्रती सहानुभूती व्यक्त केली आहे. भोजपूरी विश्वातील दिनेश लाल यादव, आम्रपाली दुबे आणि अक्षरा सिंह यांनी शोक व्यक्त केला आहे. गेल्या वर्षी रवि किशनच्या रमेश नावाच्या बंधुंचे निधन झाले होते.