सुशांतसिंह प्रकरणी रिया चक्रवर्तीचा पाय अधिक खोलात? सीबीआय आणि ईडीकडूनही तपास

संतोष भिंगार्डे
Friday, 7 August 2020

या संपूर्ण प्रकरणात रिया चक्रवर्ती अधिकाधिक गुंतत चाललेली आहे. सीबीआय आणि ईडीने तिच्या भोवतीचे फासे अधिक आवळले आहेत. त्यामुळे आता सुशांतने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली याची माहिती लवकरच बाहेर येईल.

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाला आता अधिक गंभीर वळण लागले आहे. या प्रकरणात सुशांतची गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्ती अधिकाधिक गुंतत चालल्याचे दिसत आहे तसेच या प्रकरणाला राजकीय वळणदेखील लागलेले आहे. त्यामुळे सुशांत सिंहने आत्महत्या केली आहे की त्याची हत्या झाली आहे, किंवा प्रेमप्रकरण त्याच्या आत्महत्येला कारणीभूत आहे की आणखी काही याचा शोध आता लवकरच लागेल अशी अपेक्षा आहे.

रुग्णालयाने बिलासाठी डिस्चार्ज नाकारला; नगरसेवकाने पीपीई कीट घातली आणि रुग्णाला चक्क उचलून बाहेर आणले

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली त्याला आता लवकरच दोन महिने पूर्ण होतील. या कालावधीत मुंबई पोलिसांनी निर्माते व दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, आदित्य चोप्रा, महेश भट, रिटा चक्रवर्ती अशा जवळपास पन्नासहून अधिक व्यक्तींची चौकशी केली. हिंदी चित्रपटसृष्टीतील घराणेशाही-कंपूशाही त्याच्या आत्महत्येस जबाबदार आहे, असे काही सेलिब्रेटींनी म्हटले आहे.

पाऊस तर ओसरला; मुंबईत आता मात्र डेंगी, लेप्टोचा वाढता धोका

कंगना रानौतने त्याबाबतचा एक व्हिडीओ शेअर केला आणि आरोप केला. त्यानंतर पोलिसांनी काही जणांची चौकशी केली. बिहारचे पोलिस मुंबईत आले आणि
ते आपल्या राज्यात परतले. केंद्र सरकारने सीबीआय चौकशीची परवानगी दिली आहे. सुशातंची गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्तीची आता ईडीतर्फे चौकशी केली जात आहे. तिच्यासह अन्य काही जणांवर गुन्हेदेखील दाखल करण्यात आले आहेत. 

खासगी रुग्णालयाच्या अवाजवी शुल्क आकारणीला बसणार चाप; राज्य सरकारने उचलले महत्वाचे पाऊल

सुशांतची आत्महत्या नसून हत्या आहे, असेही बोलले जात आहे. या प्रकरणात एका राजकीय नेत्याचा हात आहे अशीही चर्चा रंगलेली आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणात रिया चक्रवर्ती अधिकाधिक गुंतत चाललेली आहे. सीबीआय आणि ईडीने तिच्या भोवतीचे फासे अधिक आवळले आहेत. त्यामुळे आता सुशांतने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली याची माहिती लवकरच बाहेर येईल. शिवाय याला कारणीभूत प्रेम प्रकरण आहे की अन्य काही कारण आहे हेदेखील लवकरच समोर येईल अशी आशा करायला हरकत नाही.
----
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rhea chakraborty goes under investigation for sushant singh rajpur incident