Richa Chaddha : 'माझं सगळं सामान व्हॅनिटी व्हॅनच्या बाहेर फेकून दिलं', रिचानं सांगितलं बॉलीवूडमधलं सत्य

बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयानं वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये रिचा ही नेहमीच चर्चेत राहिली आहे.
Richa chadha On Discrimination
Richa chadha On Discriminationesakal

Richa chadha On Discrimination : बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयानं वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये रिचा ही नेहमीच चर्चेत राहिली आहे. त्याचे कारण तिच्या वेगळी शैली. रिचा ही स्वभावानं बंडखोर आहे. तिला अन्याय सहन होत नाही. कुणावर झालेला अन्यायही तिला पाहवत नाही. त्याच्याविरोधात ती सतत आवाज उठवते. आताही तिनं तिच्या एका मुलाखतीमध्ये बॉलीवूडमध्ये काय चालते याविषयी प्रतिक्रिया दिली आहे.

रिचानं बॉलीवूडमध्ये आपल्याला वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी वेगळी ओळख निर्माण करावी लागल्याचे सांगते. मला काही इतक्या सहजासहजी लाईमलाईटमध्ये येऊ दिलं नाही. तो एक वेगळाच भाग आहे. बॉलीवूडमध्ये कंपूशाही आहे असे यापूर्वी म्हटले गेले आहे. त्यावरुन अनेकदा मोठ्या प्रमाणात वादही झाल्याचे दिसून आले आहे. जातीयवाद, घराणेशाही यामुळे बॉलीवूडमध्ये आजवर वेगवेगळ्या कलाकारांनी भाष्य केले आहे. यात रिचाचे नाव घ्यावे लागेल.

Also Read - manipur violence : दोन महिन्यांपासून अशांत असलेलं मणिपूर हे नवं काश्मीर बनतंय का? या

माझ्यासोबत कित्येकवेळा भेदभाव झाला आहे. त्यावरुन मला वेगवेगळ्या त्रासाला सामोरं जावं लागलं आहे. त्यावरुन मी अनेकांकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला. पण माझी कुणीही मदत केलेली नाही. त्यामुळे मी स्वतच त्याविरोधात लढण्याचे ठरवले. काही अंशी मी त्यात यशस्वीही झाले. लोकांचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन पूर्णपणे वेगळा असल्याचे दिसून आले आहे. कित्येक कलाकार देखील त्यावरुन आपली पारख करण्याचा प्रयत्न करतात. पण जेव्हा आपल्यावर अन्याय होतो तेव्हा मात्र कुणीही पुढे येत नाही. असे रिचानं म्हटले आहे.

Richa chadha On Discrimination
Viral Video : भाड्याच्या पैशावरून वाद! क्रूर रिक्षावाल्याने महिलेला नेलं फरफटत; अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद

एका चित्रपटाच्या शुटींगच्यावेळी माझ्यासोबत जे काही झाले ते भयानक होते. मी व्हॅनिटी व्हॅनमध्ये होते. दिग्दर्शक म्हणाले ज्यावेळी तुझा टेक सुरु होईल तेव्हा बोलावण्यात येईल. मी त्यावेळी आजारी देखील होते. मला खूप ताप होता. म्हणून मी स्पेशल व्हॅनिटी व्हॅनमध्ये बसले होते. ते काहींना पाहवलं नाही. त्यांनी मला ज्युनिअर आर्टिस्ट सारखी वागणूक दिली. आणि माझे सामान त्या व्हॅनिटी व्हॅनच्या बाहेर टाकले. यामुळे खूप वाईट वाटले.

Richa chadha On Discrimination
Shah Rukh Khan : राजकुमार हिरानीच्या चित्रपटात यापूर्वी शाहरुख का नव्हता?

मी त्यांना त्याबाबत विचारले तर त्यांना काही उत्तर देता येईना. ज्यांच्यासाठी व्हॅनिटी व्हॅन मागवली होती ते आले होते. पण माझ्यासोबत असे वागण्याचा त्यांना काहीच अधिकार नव्हता.रिचानं परखडपणे तिची भूमिका यावेळी मांडली होती. त्यागोष्टीवरुन आपल्याला खूप काही शिकायला मिळाले. असेही तिनं सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com