Sai Tamhankar: सईची टिकली शेफाली वैद्य यांच्या रडारवर! 'कोणती महाराष्ट्रीयन स्त्री...'| Sai Tamhankar trolled by Shefali vaidya Maharashtrian woman | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sai Tamhankar news

Sai Tamhankar: सईची टिकली शेफाली वैद्य यांच्या रडारवर! 'कोणती महाराष्ट्रीयन स्त्री...'

Shefali Vaidya On Tikli: केवळ टीव्ही मनोरंजन नाहीतर मराठी चित्रपट, वेबसीरिजच्या माध्यमातून आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटविणाऱ्या अभिनेत्रींध्ये सई ताम्हणकरचे नाव घेतले जाते. सई आता काही लोकांच्या टीकेची (Marathi Actress Sai Tamhankar) धनी होताना दिसत आहे. सध्या सगळीकडे बाप्पाचा जल्लोष सुरु आहे. मनोरंजन विश्वातील विविध सेलिब्रेटींनी मोठ्या उत्साहात बाप्पाची आराधना करत प्राणप्रतिष्ठा केली आहे. यात केवळ मराठीच सेलिब्रेटींचा समावेश नाहीतर बॉलीवूडमधील सेलिब्रेटींनी देखील सहभाग घेतला आहे. यासगळ्यात सईची सोशल मीडियावर वेगळ्याच कारणासाठी चर्चा सुरु झाली आहे.

शेफाली वैद्य यांनी सईवर टीका केली आहे. त्याचे कारण सईनं टिकली न लावताच गणरायाची मुर्ती हातात घेतली म्हणून. त्यांनी ट्विट करुन त्यावरुन नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, कोणती महाराष्ट्रायीन स्त्री ही टिकली न लावता गणरायाला घरी घेऊन येईल. त्या व्टिटवर अनेकांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. काहींनी शेफाली यांना उलटे प्रश्नही विचारले आहे. वैद्य हा सोशल मीडियावर आपल्या परखड भूमिकेसाठी ओळखल्या जातात. त्या लेखिका, प्रवक्ता, उद्योजिका आहेत. याशिवाय एका पक्षाशी संबंधित असून त्या पक्षाचा प्रचार आणि प्रसाराची भूमिका त्या पार पाडत असल्याचे दिसून आले आहे. त्यांच्या त्या पोस्टनंतर वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे.

एका प्रसिद्ध इंग्रजी वृत्तपत्रात सईचा फोटो प्रसिद्ध झाला आहे. त्यात तिनं हातात गणरायाची मुर्ती घेतली आहे. त्या फोटोंवर शेफाली वैद्य यांनी आक्षेप घेत आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार कोणती महाराष्ट्रयीन स्त्री ही टिकली न लावता गणरायाला घरी घेऊन येईल? सईवर टीका करत असताना नेटकऱ्यांनी शेफाली वैद्य यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. असं काय घडलं की तुम्ही अभिनेत्रीला एवढं धारेवर धरता आहात...अशा आशयाचे प्रश्न त्यांना विचारण्यास सुरुवात झाली आहे. काहींनी वैद्य यांच्यावर टीकाही केली आहे.

हेही वाचा: ऋषीपंचमीचा खगोलशास्त्राशी काय आहे संबंध?

हेही वाचा: 'माझं मन इतकं चंचल की...', प्राजक्ताचं गणेशाला साकडं

सईच्या बाबत सांगायचे झाल्यास, तिला नुकताच फिल्मफेअरचा पुरस्कार जाहिर झाला आहे. तिनं मिमिमध्ये जी भूमिका साकारली होती. त्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. यानिमित्तानं तिच्यावर कौतूकाचा वर्षाव होताना दिसत आहे.

हेही वाचा: ऋषिपंचमीच्या व्रतामागचं 'लॉजिक' नेमकं आहे तरी काय?

Web Title: Sai Tamhankar Trolled By Shefali Vaidya Maharashtrian Woman Home Shri Ganesh Without Bindi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..