Salaar Cast Salary: 'सालार' साठी प्रभासनं घेतलं 'बाहूबली' मानधन! तर इतर कलाकरांनी किती घेतली फी?

सालारसाठी कलाकारांनी घेतलंय तगडं मानधन..वाचा!
Salaar Cast Salary
Salaar Cast Salary Esakal
Updated on: 

Salaar Cast Salary: साउथ सुपरस्टार प्रभास हा सध्या त्याच्या 'सालार: भाग १ सिझफायर या चित्रपटामुळे चर्चेत आहे. सालार या चित्रपटाचा ट्रेलर सोमवारी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने प्रतिक्षा करत आहे.

प्रभासचे मागील काही सिनेमे फारशी कमाल करु शकले नाहीत. त्यात बरेच चित्रपट फ्लॉप झाले आहे. ज्यात आदिपुरुष, राधेश्याम, साहो अशा अनेक चित्रपटांचा सामावेश आहे.

त्यामुळे आता चाहत्यांना त्याच्या सालार या चित्रपटाकडून खुप अपेक्षा आहेत. आता या सिनेमाचा ट्रेलर देखील प्रेक्षकांना आवडला आहे.

'केजीएफ' सारख्या सुपरहिट फ्रँचायझीचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा सिनेमा 22 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर या सिनेमात तगडी स्टार कास्ट घेण्यात आली आहे. आता या चित्रपटात कोणते कलाकार आहेत आणि त्यांनी किती मानधन घेतले यावर नजर टाकूया.

Salaar Cast Salary
Tanuja Health Update: काजोलची आई ज्येष्ठ अभिनेत्री तनुजांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट! ICUमध्ये सुरु होते उपचार

प्रभास:

प्रभास या चित्रपटात देवाची भूमिका साकारत आहेत. देवा हा आपला मित्र वरधराजसाठी काहीही करण्यास तयार असल्याचं ट्रेलरमध्ये दिसते.

मिडिया रिपोर्टनुसार, 400 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटासाठी प्रभासने 100 कोटी रुपये मानधन घेतले आहे. यासोबत चित्रपटाच्या कमाईतून त्याला 10 टक्के हिस्सा मिळणार आहे.

पृथ्वीराज सुकुमारन

'सालार: भाग १ सीजफायर' मध्ये पृथ्वीराज सुकुमारन प्रभासच्या मित्र वरधराजच्या भूमिकेत दिसणार आहेत. वृत्तानुसार, पृथ्वीराजने चित्रपटात आपली भूमिका साकारण्यासाठी 4 कोटी रुपये घेतले आहे.

Salaar Cast Salary
Urvashi Rautela Pressotherapy: उर्वशीचा नादच नाय! प्रेसोथेरपी करतानाचा फोटो व्हायरल; एका सेशनची किंमत ऐकून व्हाल थक्क

श्रुती हासन

श्रुती हासन या चित्रपटात महत्वाच्या भुमिकेत आहे. ती प्रभासबरोबर दिसणार आहे. ट्रेलरमध्ये श्रुतीची एक झलक पहायला मिळत आहे. श्रुतीने या चित्रपटासाठी 8 कोटी रुपये घेतल्याचे बोलले जात आहे.

जगपती बाबू

अभिनेता जगपती बाबूने सालारसाठी 4 कोटी रुपये मानधन घेतले आहे. तो या चित्रपटात व्हिलनच्या भुमिकेत असल्याचे बोलले जात आहे.

तर चित्रपटाचा दिग्दर्शक प्रशांत याने सालार चित्रपटासाठी तब्बल 50 कोटी रुपये घेतल्याचे बोलले जात आहे.

Salaar Cast Salary
Jacqueline Fernandez: जॅकलिनची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयात धाव! काय आहे प्रकरण?

22 डिसेंबरला हा सिनेमा हिंदी, तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नडमध्ये रिलिज होणार आहे. तर टॉलिवूडचा सालार बॉलिवूडच्या डंकी सिनेमासोबत स्पर्धा करणार आहे. शाहरुख खानचे चाहते या डंकी सिनेमासाठी उत्सुक आहे. आता ही स्पर्धा कोणता सिनेमा जिंकेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com