सलमानने चाहत्यांना दिलं 'सरप्राईज', ईदच्या मुहूर्तावर नवा 'ब्रँड' लॉन्च

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 May 2020

'बीईंग ह्यूमन' कपड्यांचा ब्रँड, फिटनेस इक्विपमेंट, जिम आणि सायकलिंग ब्रँड लाँच केल्यानंतर आता अभिनेता सलमान खानने नवीन ब्रँड लॉन्च केला आहे.

मुंबई : 'बीईंग ह्यूमन' कपड्यांचा ब्रँड, फिटनेस इक्विपमेंट, जिम आणि सायकलिंग ब्रँड लाँच केल्यानंतर आता अभिनेता सलमान खानने नवीन ब्रँड लॉन्च केला आहे. हा एक पर्सनल केअर ब्रँड आहे. फ्रेश (एफआरएसएच) असे या ब्रँडचे नाव आहे. ईदच्या मुहूर्तावर सलमानने या ब्रँडची घोषणा केली आहे. ट्विटर अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत त्यांनी याची माहिती दिली आहे. 

नक्की वाचा : उत्तर प्रदेश सोशल मीडिया डेस्कला धमकी देणारा आला गोत्यात, महाराष्ट्रातल्या 'या' जिल्ह्यातून अटक

संपूर्ण देश लॉकडाऊन असताना भाईजान त्याच्या चाहत्यांना सरप्राईज देत आहे. लॉकडाऊनमध्येच त्याने यूट्यूब चॅनल आणि त्याची गाणी प्रदर्शित करत चाहत्यांना सरप्राईज दिलं होतं. आता ईदच्या निमित्ताने हा ब्रँड लाँच करून त्याने चाहत्यांना आणखी एक सरप्राईज दिलं आहे.  याबाबत एक व्हिडिओ सलमानने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये तो या ब्रँडचा पहिला प्रॉडक्ट सॅनिटायझर हे लाँच करताना पाहायला मिळतो आहे.

 

सॅनिटायझरनंतर या ब्रँडचे बॉडी स्प्रे, परफ्युम, साबण, सौंदर्य प्रसाधने अशा प्रकारचे अनेक प्रोडक्ट लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहेत. परंतु सध्या करोनाच्या वाढत्या प्रभावामुळे सलमान केवळ सॅनिटायझरची विक्री करत आहे.

हे ही वाचा : रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि संजय राऊतांमध्ये 'ट्वीट वार'! वाचा बातमी...

या ब्रँडबाबत अधिक माहिती देण्यासाठी सलमानने एक व्हिडीओ शेअर करत तो सांगतोय की, ' मी नवीन ग्रुमिंग आणि पर्सनल केअर ब्रँड फ्रेश लाँच करत आहे. या ब्रँड आम्ही आणखी काही चांगले प्रॉडक्ट घेऊन येणार आहोत. आधी आम्ही या ब्रँडचा डिओड्रंट सुरू करणार होतो पण सध्याच्या काळात सॅनिटायझरची जास्त गरज आहे. म्हणून आम्ही आधी या ब्रँडच सॅनिटायझर लाँच केले आहे. काही दिवसांनंतर आम्ही याचे बॉडी स्प्रे, परफ्युम, साबण, सौंदर्य प्रसाधने हे सर्व लाँच करणार आहोत. या ब्रँडची क्वालिटी देखील फार चांगली आहे. आणि बजेटमध्ये असणारा हा ब्रँड आहे. '. या सॅनिटायझरची 'रहा फ्रेश, रहा सुरक्षित' ही टॅगलाईन आहे. 

महत्वाची बातमी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी, आठवड्याभरात मुंबईत कोरोना रुग्णवाढीचा दर 'इतका' वाढला

सलमान सध्या त्याच्या पनवेल येथील फार्महाऊसवर आहे आणि तेथूनच त्याने हा ब्रँड लाँच केला आहे. सध्या त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर फार चर्चेत आहे. आता सलमानच्या या प्रॉडक्टला चाहते किती प्रतिसाद देतात हे पाहणं रंजक ठरणार आहे.

Salman khan gives fans a surprise, launches new brand on the eve of Eid


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Salman khan gives fans a surprise, launches new brand on the eve of Eid