Salman Khan ने शेअर केला 'HOT' शर्टलेस फोटो आणि चाहत्यांना म्हणाला...Bhaijaan Movie | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Salman Khan HOt Shirtless Photo Viral, fans Reacts on Photo

Salman Khan ने शेअर केला 'HOT' शर्टलेस फोटो आणि चाहत्यांना म्हणाला...

Salman Khan Shirtless Photo: सुपरस्टार सलमान खाननं पुन्हा जीममध्ये वर्कआऊट करतानाचा शर्टलेस फोटो(Shirtless Photo) पोस्ट करत चाहत्यांना मोठी ट्रीट दिली आहे. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या त्या शर्टलेस फोटोमुळे सलमनाच्या चाहत्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस त्यावर पाडला आहे. सलमाननं जीममध्ये वर्कआऊट करतानाचा तो फोटो त्याच्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर केला आहे.(Salman Khan HOt Shirtless Photo Viral, fans Reacts on Photo)

हेही वाचा: Laal Singh Chaddha मध्ये शाहरुख खानही, भूमिकेसाठी आमिरने असं मनवलं बादशहाला

सलमान त्या फोटोत त्याची पिळदार बॉडी दाखवताना दिसत आहे. या फोटोतील त्याचा लूक सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. या फोटोतील त्याची बॉडी पाहून तो त्याच्या आगामी 'भाईजान' सिनेमाची तयारी करत असल्याचं दिसत आहे. सलमान लवकरच 'भाईजान' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. सलमाननं हा फोटो शेअर करत लिहिलं आहे,'' बिईंग स्ट्रॉंग...हॅव ए लूक...''

हेही वाचा: 'कोलकातामधील त्या थिएटरात..',अक्षयनं शेअर केलं आयुष्यातील मोठं सीक्रेट

सलमानच्या या शर्टलेस हॉट फोटोवर प्रतिक्रिया नोंदवताना चाहत्यांनी हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. एकानं लिहिलं आहे, 'ट्विटरही हॉट झालं आहे'. तर एकानं सलमानच्या फीटनेसची प्रशंसा केली आहे.

सलमाननं अद्याप आपल्या सिनेमाचं नाव 'भाईजान' असेल अशी अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र निर्माते-दिग्दर्शकांना ते 'भाईजान ठेवायचं आहे अशी बातमी कानावर आली आहे. आधी या सिनेमाचं नाव 'कभी ईद,कभी दिवाली' हे होतं. या सिनेमात पूजा हेगडे,शहनाझ गिली,सिद्धार्थ निगम,राघव जुएल आणि पलक तिवारी देखील दिसणार आहे. बातमी कानावर पडली होती की शहनाझ गिल या सिनेमातून बाहेर पडली आहे. पण नुकतंच तिनं यासंदर्भात स्पष्टिकरण देत म्हटलं आहे की,''मी अजूनही या सिनेमाचा भाग आहे''. तिनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की,''या अफवा माझं मनोरंजन करत आहेत. आणि मी त्या एन्जॉय करतेय. मी आता वाट पाहतेय लोकांनी हा सिनेमा पहावा आणि अर्थातच यामधील माझ्या भूमिकेचाही आनंद घ्यावा''.

Web Title: Salman Khan Hot Shirtless Photo Viral Fans Reacts On

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..