Laal Singh Chaddha मध्ये शाहरुख खानही, भूमिकेसाठी आमिरने असं मनवलं बादशहाला

सिनेमाच्या रिलीजला काही शेवटचे दोन दिवस उरले असताना आमिर खाननं 'लाल सिंग चड्ढा'मध्ये शाहरुख दिसणार हे स्वतः जाहीर केलं आहे.
Aamir Khan Reveals Shahrukh khan cameo in his movie Laal Singh Chaddha
Aamir Khan Reveals Shahrukh khan cameo in his movie Laal Singh ChaddhaGoogle

Laal Singh Chaddha: आमिर खानचा(Aamir Khan) लाल सिंग चड्ढा सिनेमा येत्या ११ ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमाची आमिरचे चाहते गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. तब्बल ४ वर्षांनी आमिर मोठ्या पडद्यावर दिसणार असल्यामुळे हे ओघाने आलंच. हा सिनेमा हॉलीवूडच्या प्रसिद्ध 'फॉरेस्ट गम्प' सिनेमाचा ऑफिशिअल रीमेक असल्यामुळे ही उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे. सिनेमात आमिर खान व्यतिरिक्त करिना कपूर, नागाचैतन्य,मोना सिंग असे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. आता आमिरनं सिनेमाच्या प्रदर्शनाआधी एक मोठा खुलासा केला आहे. हा खुलासा ऐकल्यानंतर मात्र आमिरसोबतच शाहरुखचे चाहतेही खूप खूश झाले आहेत. आमिरनं सांगितलं आहे की सिनेमात शाहरुख खान (Shahrukh Khan) कॅमियो साकारत आहे. म्हणजे छोटयाशा पाहुण्या कलाकराच्या भूमिकेत किंग खान दिसणार आहे.(Aamir Khan Reveals Shahrukh khan cameo in his movie Laal Singh Chaddha)

Aamir Khan Reveals Shahrukh khan cameo in his movie Laal Singh Chaddha
'कोलकातामधील त्या थिएटरात..',अक्षयनं शेअर केलं आयुष्यातील मोठं सीक्रेट

एका मुलाखतीत आमिरनं सांगितलं की शाहरुख खान देखील या सिनेमाशी जोडला गेला आहे. शाहरुख विषयी बोलताना आमिर म्हणाला की,''मी शाहरुखला म्हणालो होतो की मला कुणी असा हवा आहे जो स्वतःला अमेरिकेला रिप्रेझेंट करणाऱ्या एल्विस प्रेस्लेसारखं सादर करेल. आमिर हे देखील म्हणाला होता की मला भारताचा सर्वात मोठा स्टार हवा आहे'', आणि तेव्हा शाहरुख लाल सिंग चड्ढा सिनेमात काम करण्यासाठी तयार झाला.

Aamir Khan Reveals Shahrukh khan cameo in his movie Laal Singh Chaddha
बंगाली अभिनेत्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पत्नीला दोषी ठरवत शेअर केला व्हिडीओ

आमिरनं हा खुलासा करण्याआधी शाहरुखच्या कॅमियो संदर्भात कोणतीच घोषणा केली नव्हती. एवढंच नाही,जेव्हा शाहरुखला विचारलं गेलं होतं की लाल सिंग चड्ढा तू पाहिलास का? तेव्हा त्याने उत्तर दिले होते की,आमिर म्हणाला की पहिल्यांदा पठाण दाखव.

Aamir Khan Reveals Shahrukh khan cameo in his movie Laal Singh Chaddha
Richa Chaddha Wedding: असं असणार मुंबईतलं ग्रॅंड रीसेप्शन, वाचा सविस्तर...

आमिरला काही दिवसांपूर्वीच जेव्हा विचारलं गेलं होतं की,लाल सिंग चड्ढा ही शीख व्यकिरेखाच का? तेव्हा तो म्हणाला होता की, टेक्नीकली पहायला गेलं तर लाल सिंग ही व्यक्तिरेखा कोणीही साकारू शकतो. पण सिनेमाचा लेखक अतुल कुलकर्णीनं विचार केला की,ज्या काळातला सिनेमा आपण दाखवत आहोत तो काळ आहे १९८३-८४ चा आणि त्या दरम्यान शीख समाजानं खूप अडचणींचा सामना केला होता. त्यामुळे त्याने विचार केला की लाल सिंग ही व्यक्तीरेखा शीख असायला हवी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com