एका काळविटासाठी लॉरेन्स बिष्णोई सलमानला जीवे मारण्याची धमकी?

मुंबई पोलिसांनी आता बॉलीवूडचा भाईजान सलमान खानच्या घराबाहेर पोलीस पहारा देण्यास सुरुवात केली आहे.
Salman Khan Lawrence Bishnoi's radar
Salman Khan Lawrence Bishnoi's radar esakal

Salman Khan : मुंबई पोलिसांनी आता बॉलीवूडचा भाईजान सलमान खानच्या घराबाहेर पोलीस पहारा देण्यास सुरुवात केली आहे. सलमान आणि त्याचे वडिल (Mumbai Police) सलीम खान ज्याठिकाणी रोज मॉर्निंग वॉकला जातात त्याच ठिकाणी एका बाकड्यावर त्या दोघांनाही जीवे मारण्याची धमकी अज्ञातानं दिली. (bollywood News) त्यामुळे बॉलीवूडमध्ये खळबळ उडाली आहे. वास्तविक सलमानला यापूर्वी देखील जीवे मारण्याची धमकी मिळालेली आहे. अंडरवर्ल्ड क्षेत्रातील एका बड्या गुंडानं त्याला ही धमकी दिली होती. आताही त्याला मिळालेल्या धमकीमुळे त्याच्या चाहत्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भारतामध्ये सलमानचा लाखो चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावरही त्याच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे.

बॉलीवूडचा लाडका अभिनेता सलमान खानला (Salman Khan) लॉरेन्स बिष्णोईकडून (Lawrence Bishnoi) आलेली धमकी नेमक्या कोणत्या कारणासाठी आहे, असा प्रश्न सलमानच्या चाहत्यांना पडला आहे. तुम्हाला कदाचित आठवत नसेल पण राजस्थानमध्ये सलमानच्या एका बड्या चित्रपटाचे शुटिंग सुरु होते. हम (hindi movie) साथ साथ है हे त्या चित्रपटाचे नाव. त्या शुटिंग दरम्यान सलमाननं एका काळवीटाची गोळी घालून हत्या केली होती. असा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. त्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. ते प्रकरण राजस्थान कोर्टात सुरु होते. या सगळ्या प्रकरणाचा सलमानच्या धमकीशी काय संबंध असा प्रश्न तुम्हाला पडला असेल? पण हा संबंध आहे. तो थेट बिश्नोईशी संबंधित आहे. हे अनेकांना माहिती नाही.

सलमाननं ज्यावेळी काळवीटाची शिकार केली त्यानंतर राजस्थानातील बिश्नोई समाज त्याच्यावर नाराज झाला होता. त्या समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. त्यामुळे काही करुन सलमानला या शिकार प्रकऱणात शिक्षा व्हायला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. एनडीटिव्हीनं दिलेल्या माहितीनुसार, बिश्नाईनं 2011 मध्ये सलमानवर अटॅक करण्याचा एकदा प्लॅनही केला होता. ज्यावेळी सलमान हा रेडी या चित्रपटाच्या शुटमध्ये बिझी होता. मात्र तो प्लॅन काही कारणास्तव फसला. गँग्गस्टार नरेश शेट्टीला सलमानला मारण्याचा टास्क देण्यात आला असेही सांगण्यात येते. त्यानंतर पुन्हा बिश्नोईनं 2018 साली सलमानला मारण्याचा प्लॅन तयार केला होता.

Salman Khan Lawrence Bishnoi's radar
Salman Ex Girlfriend: ऐश्वर्यासारखे त्या अभिनेत्रींकडूनही सत्य बाहेर येईलच

राहुल उर्फ सुन्नी हा बिश्नोईचा खास माणूस होता. त्याला 2020 मध्ये एका हत्येच्या आरोपात पोलिसांनी अटक केली होती. असं सांगितलं जातं की. त्यालाही सलमानला मारण्यासाठी सांगण्यात आले होते. यावेळी त्यानं अनेकदा मुंबईला सलमानच्या घरी रेकीही केली होती. आता सलमानला पुन्हा एकदा धमकीचे पत्र आले आहे. त्यामध्ये तुझा आम्ही सिद्धु मुसेवाला करुन टाकु असे त्याला सांगण्यात आले आहे. या पत्रानंतर सलमानच्या घरी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Salman Khan Lawrence Bishnoi's radar
सलीम आणि सलमान खान पितापुत्राला जीवे मारण्याची धमकी!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com