छोटी गंगूबाई आठवली का?, 8 महिन्यात कमी केलं 22 किलो वजन, सलोनी डैनी ओळखूच येईना.. Saloni Daini | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Saloni daini aka gangubai transformation from fat to fit, 22 kg weight loss.

छोटी गंगूबाई आठवली का?, 8 महिन्यात कमी केलं 22 किलो वजन, सलोनी डैनी ओळखूच येईना...

Saloni daini: गंगुबाई आठवते का? अहो आलिया नाही हो, आपली सलोनी धानी, हा तिच सलोनी जिने 'कॉमेडी सर्कस'मध्ये सगळ्यांना हसवले होते. 'गंगुबाई', 'शकील', 'टुक-टुक' मजेदार भूमिका केला होत्या. सलोनीने लहान वयातच तिच्या परफेक्ट कॉमिक टायमिंगने सर्वांची मने जिंकली. आता ही चिमुरडी खूप मोठी झाली असून आजकाल ती तिच्या नवीन प्रोजेक्टमुळे चर्चेत आहे. (Saloni daini aka gangubai transformationfrom fat to fit, 22 kg weight loss.)

हेही वाचा: Nora Fatehi: ढसाढसा रडणाऱ्या चाहतीला मिठीत घेऊन असं काय केलं नोरानं की नेटकरी करु लागले ट्रोल..

सलोनी सोशल मीडियावर पण ॲक्टीव्ह असते. तिने तिचे लेटेस्ट फोटो तिथं शेअर केले आहेत. टीव्हीवर दिसणारी ही चिमुरडी आता इतकी सुंदर झाली आहे की. ग्लॅमरच्या दुनियेत पुढे जाण्यासाठी आणि स्वत:ला फीट ठेवण्यासाठी सलोनीने तिच्या फीगरवर खूप मेहनत घेतली आहे.

हेही वाचा: Box office:अमिताभच्या 'ऊंचाई'ने ऋषभ शेट्टीच्या कांताराला फोडला घाम, पहिल्याच दिवशी कमावले इतके करोड

सलोनीला फिटनेससाठी भरपूर मेहनत घेते. योग्य आरोग्य ठेवण्यासाठी ती जिममध्ये जाते आणि हेल्दी फूड खाते. यामुळेच सलोनीची फिगर परफेक्ट दिसते आहे. सलोनीने आठ महिन्यांत २२ किलो वजन कमी केले आहे. पूर्वी 80 किलो वजन असलेल्या सलोनीने 22 किलो वजन कमी केले आहे.

हेही वाचा: Exclusive:'धमक्यांना भीत नाही,माझा पुढचा चित्रपटही महाराजांवरच..','हर हर महादेव'च्या दिग्दर्शकाचा खुलासा

अलीकडे सलोनीने सतीश कौशिकसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. व्हायरल झालेल्या चित्रात, सतीश कौशिक एखाद्या चित्रपटातील भूमिकेच्या पेहरावात दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना सलोनीने या दिग्गज कलाकारा सोबत आपण काहीतरी नवीन घेऊन येत असल्याची माहितीही दिली. सलोनीला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी तिचे चाहते आता उत्सुक आहेत.