विनोदी अभिनेते मुश्ताक मर्चंट यांचं वयाच्या ६७ व्या वर्षी निधन

'सागर','सीता और गीता' अशा अनेक सुपरहिट सिनेमांतून साकारली होती महत्त्वाची भूमिका
Mushtaq Merchant
Mushtaq MerchantGoogle

शोले,सागर,हात की सफाई,सीता और गीता अशा अनेक सिनेमांतून काम केलेले अभिनेते मुश्ताक मर्चंट (Mushtaq Merchant) यांचं वयाच्या ६७ व्या वर्षी मुंबईतील 'होली फॅमिली' इस्पितळात निधन झालेले आहे. ते गेली अनेक वर्ष मधुमेहाने त्रस्त होते. सीता और गीता,सागर,हाथ की सफाई,जवानी दिवानी अशा अनेक हिंदी सिनेमांतून त्यांनी काम केले होते.

Mushtaq Merchant
सनी लिओनचे वादग्रस्त 'मधुबन' गाणे आता दिसणार 'या' वेगळ्या अंदाजात

अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांच्या शोले सिनेमांतही त्यांनी काम केलं होतं. पण सिनेमाची वाढलेली लांबी लक्षात घेता त्यांच्यावर चित्रित झालेले सीन सिनेमांतून वगळण्यात आले होते. या सिनेमात त्यांचा डबल रोल होता. जवळ-जवळ सोळा वर्षांपूर्वींत त्यांनी सिनेसृष्टीपासून लांब राहण पसंद केलं होतं. यादरम्याने ते धार्मिक कार्यक्रमांमध्ये व्यस्त असायचे. अनेक दिवसांपासून ते मधुमेहाशी दोन हात करीत होते. पण अखेर मधुमेह या आजाराने त्यांचा घात केलाच.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com