सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची सीबीआयमार्फत चौकशी करावी; अभिनेत्री रूपा गांगुलीची मागणी...

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 24 June 2020

सुशांतच्या आत्महत्येची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी अभिनेत्री कंगना रानौत, अभिनेता शेखर सुमन, अभिनेत्री पायल रहतोगी यांच्यासहित काही राजकीय नेत्यांनीही केली आहे.

मुंबई : निर्माते व दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांच्या महाभारत या मेगामालिकेत द्रौपदीचे काम करणारी अभिनेत्री रूपा गांगुलीने सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची सीबीआयमार्फत चौकशी करावी अशी मागणी केली आहे. त्याबाबतचे तिने ट्विट केले असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनादेखील टॅग केले आहे.

लग्न सोहळ्यांच्या नव्या नियमांसह नवे पॅकेज; कॅटरर्स व्यवसायही लागला तयारीला...

सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर संपूर्ण देश हळहळला होता. हिंदी चित्रपटसृष्टीत त्याच्या आत्महत्येनंतर घराणेशाहीचा मुद्दा चर्चिला गेला होता. गायक आणि कलाकार यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत घराणेशाही आहे आणि आऊटसायडर्सना येथे चांगली वागणूक मिळत नाही असे म्हटले होते. 

आता फक्त अर्धा तासात होणार कोरोनाची चाचणी! बृहन्मुंबई महापालिकेने घेतला मोठा निर्णय

सुशांतची आत्महत्या ही वैयक्तिक कारणामुळे झाली की येथील व्यावसायिक स्पर्धेमुळे झाली याचा शोध पोलिस घेत आहेत. पोलिसांनी काही जणांची चौकशी केली आहे आणि त्यांचा जबाबही घेतला आहे. पण सुशांतच्या आत्महत्येची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी अभिनेत्री कंगना रानौत, अभिनेता शेखर सुमन, अभिनेत्री पायल रहतोगी यांच्यासहित काही राजकीय नेत्यांनीही केली आहे. आता अभिनेत्री रूपा गांगुलीने एकामागोमाग एक ट्विट करीत सीबीआयमार्फत चौकशी केली जावी अशी मागणी केली आहे.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: senior actress roopa ganguly demands for cbi enquiry about sushant singh rajput incident