Sharad Ponkshe: शरद पोंक्षे या तारखेपासुन पुन्हा रंगभुमीवर आणणार 'मी नथुराम गोडसे बोलतोय' नाटक

शरद पोंक्षे हे नाटक पुन्हा एकदा गाजलेलं 'मी नथुराम गोडसे बोलतोय' नाटक रंगभुमीवर आणणार आहेत
sharad ponkshe start again mi nathuram godse boltoy marathi natak in theatre
sharad ponkshe start again mi nathuram godse boltoy marathi natak in theatre SAKAL

Sharad Ponkshe News: शरद पोंक्षेंचं मी नथुराम गोडसे बोलतोय प्रचंड गाजलंय. शरद पोंक्षेंनी या नाटकाचे महाराष्ट्रभरात असंख्य प्रयोग केले. विनय आपटेंनी हे नाटक दिग्दर्शित केलं होतं. शरद पोंक्षेंनी नाटकात नथुराम गोडसेची भुमिका साकारली होती.

आज देशाच्या ७७ व्या स्वातंत्र्यदिनी शरद पोंक्षेंनी महत्वाची घोषणा केलीय. शरद पोंक्षे हे नाटक पुन्हा एकदा रंगभुमीवर आणणार आहेत.

(sharad ponkshe start again mi nathuram godse boltoy marathi natak in theatre)

sharad ponkshe start again mi nathuram godse boltoy marathi natak in theatre
Prajakta Mali: गेल्या कित्येक जन्मांची पुण्याई की... प्राजक्ता माळीची देशाच्या स्वातंत्र्यदिनी खास पोस्ट चर्चेत Independence Day 2023

पुन्हा सुरु होणार मी नथुराम गोडसे बोलतोय नाटक

शरद पोंक्षेंनी आजच्या स्वातंत्र्यदिनी सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ शेअर करत शरद पोंक्षे लिहीतात, "नमस्कार आज १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मी तुम्हाला आज एक अतिशय आनंदाची बातमी तुम्हाला देणार आहे. मी ११ मार्च २०१८ ला मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकाचा शेवटचा प्रयोग केला.

त्यानंतर जाहीर केलं की मी यापुढे रंगभूमीवर नथुरामच्या भूमिकेत कधीही दिसणार नाही. मी त्या शब्दाशी प्रामाणिक राहिलो. गेली साडेपाच वर्षे मी हे नाटक केलं नाही.

पण गेली पाच वर्ष महाराष्ट्रात व्याख्यानाच्या निमित्ताने फिरत असताना अनेकांनी मला या नाटकाचे प्रयोग करा, असे सांगितले. आमच्या पुढच्या पिढ्यांना हे नाटक पाहायचं आहे, थोडे तरी प्रयोग करा, असे वारंवार लोक मला सांगत होते."

या तारखेपासुन सुरु होणार नाटकाचे प्रयोग

शरद पोंक्षे पुढे म्हणतात, "त्यानंतर मग मी विचार केला की, एकंदरीत माझं वय आणि नथुराम गोडसेचं वय लक्षात घेता आता जर मी हे नाटक केलं नाही तर अजून चार-पाच वर्षांनी मला ते करता येणार नाही.

त्यामुळेच मग मी फक्त ५० प्रयोगांसाठी नथुराम गोडसे बोलतोय हे नाटक करण्याचा निर्णय घेतलाय. ऑक्टोबर २०२३ संपूर्ण महाराष्ट्रात मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकाचे प्रयोग करणार आहे”

sharad ponkshe start again mi nathuram godse boltoy marathi natak in theatre
Rajan Patil: पाण्याविना तडफडणाऱ्या माश्यासारखी माझी अवस्था; डॉ. लागूंसोबत काम केलेला मराठी अभिनेता दुर्धर आजाराने ग्रस्त

अशाप्रकारे शरद पोंक्षेंच्या गाजलेल्या मी नथुराम गोडसे बोलतोय नाटकाचे प्रयोग पुन्हा सुरु होणार आहेत. मी नथुराम गोडसे बोलतोय हे नाटक विनय आपटेंनी दिग्दर्शित केलंय.

मी नथुराम गोडसे बोलतोय नाटकाचे ५०० पेक्षा जास्त प्रयोग झाले. या नाटकावर अनेक वाद विवाद झाले. पण तरीही शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरेंनी सपोर्ट केल्याने या नाटकाने अनेक प्रयोगांचा टप्पा ओलांडला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com