रियाच्या `त्या` वक्तव्याची  शेखर सुमनने उडवली खिल्ली 

संतोष भिंगार्डे
Sunday, 30 August 2020

रियाने एका वाहिनीशी झालेल्या संभाषणात म्हटले होते, "सुशांत माझ्या स्वप्नात आला आणि तो म्हणाला की, जा आणि तू काय करत आहेस हे सर्वांना सांग.' अभिनेते शेखर सुमन यांनी ट्‌विटरवरही अशाच प्रकारे भाष्य केले आहे.

मुंबई  ः सुशांतसिंह राजपूत याच्या निधनानंतर पहिल्यांदाच रिया चक्रवर्तीने एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिच्यावरील सर्व आरोपांना प्रत्युत्तर दिले होते. एवढ्या दिवसांनंतर आता ती मुलाखत का देत आहे, हे रियाने सांगितले. रियाने तिच्या मुलाखतीच्या सुरुवातीला सांगितले की, सुशांत तिच्या स्वप्नात आला होता आणि त्याने मला मौन सोडण्यास सांगितले.  तिच्या या वक्तव्यावर अभिनेते शेखर सुमन यांनी ट्‌विटरवरही अशाच प्रकारे भाष्य केले आहे.

अधिक वाचाः  सुशांतच्या बँक अकाऊंटमधल्या ७० कोटींचा असा झाला व्यवहार, वाचा सविस्तर

आता शेखर सुमन यांनी आपल्या ताज्या ट्‌विटमध्ये रियाच्या या गोष्टींची थट्टा केली आहे. शेखर सुमन यांनी आपल्या शैलीत ट्‌विट केले आहे. त्यांनी आपल्या ट्‌विटमध्ये लिहिले आहे की, "मी रियाच्या या अभिनयाने एका क्षणासाठी फसलो. तिने पूर्ण तयारीसह सर्वांना असे काही सांगितले की मी भावूक झालो.

हेही वाचाः  लोकल नाहीतर मुंबईत लवकरच सुरु होणार 'ही' सेवा, वाचा सविस्तर

तिचे अश्रू, निर्मळ मन, उत्तम अभिनयाने मीही प्रभावित झालो होतो. मग अचानक माझ्या स्वप्नात सुशांत आला आणि मला म्हणाला- "रियावर विश्‍वास ठेवू नका.' सुरुवातीपासूनच सुशांतच्या मृत्यूविषयी आवाज उठवणाऱ्या कलाकारांपैकी शेखर सुमन यांचा समावेश असून, या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती. शेखर सुमन सुशांतच्या वडिलांना भेटण्यासाठी पटना येथेही गेले होते. त्यांनी रियाची अशाप्रकारे खिल्ली उडविल्यामुळे अनेकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे.  

( संपादन ः रोशन मोरे)

 

Shekhar Suman reaction to statement by rhea chakraborty


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shekhar Suman reaction to statement by rhea chakraborty?amp