Farhan - Shibani: अख्तरांची सून झाली, सासऱ्यांबरोबर थिरकली

बॉलीवूडमधील गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आलेले कपल्स म्हणून शिबानी दांडेकर आणि फरहानच्या नावाचा (Farhan And Shibani Dandekar) उल्लेख करावा लागेल.
Shibani Dandekar
Shibani Dandekar

Bollywood News: बॉलीवूडमधील गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आलेले कपल्स म्हणून शिबानी दांडेकर आणि फरहानच्या नावाचा (Farhan And Shibani Dandekar) उल्लेख करावा लागेल. नुकतचं तिचं लग्न झालं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दोघांच्या लग्नाची चर्चा नेटकऱ्यांमध्ये होती. त्यांनी सुरुवातीला नोंदणी पद्धतीनं विवाह केला होता. त्यानंतर फार्म हाऊसवर काही मोजक्या जणांच्या उपस्थितीत ते विवाहबद्ध झाले होते. आता शिबानी आणि तिचे सासरे जावेद अख्तर यांच्या डान्सची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली असून त्या व्हिडिओला नेटकऱ्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. Wedding Of farhan And Shibani Dandekar photo viral

फरहाननं त्याच्या इंस्टावरुन लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ शेयर केले आहेत. त्यामधील काही फोटोंमध्ये शिबानी ही जावेद अख्तर यांच्यासोबत डान्स करतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. नेटकऱ्यांनी त्या फोटोंना लाईक्स करत भन्नाट कमेंटस् दिल्या आहेत. त्यावर एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की, लक्ष वेधून घेणारा हा क्षण आहे. त्या फोटोमध्ये शिबानी ही आपल्या सासऱ्यांसोबत डान्स करताना दिसत आहे. दुसऱ्यानं लिहिलं आहे की, शिबानीनं एकदम मॉडर्न पद्धतीचा डान्स केला आहे.

Shibani Dandekar
आली लहर, केला कहर! कचोरी खायची म्हणून मध्येच थांबवली ट्रेन; VIDEO VIRAL

शिबानी ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी आहे. आयपीएलमध्ये तिनं केलेल्या होस्टिंगची क्रेझ होती. त्यामुळे ती चर्चेतही आली होती. शिबानी दांडेकर ही अनुषा दांडेकरची बहिण आहे. या दोन्ही बहिणी सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत असतात. शिबानीनं यापूर्वी अमेरिकेमध्ये एक टीव्ही शो होस्ट केला आहे. यासोबतच ती गायिका आणि मॉडेल देखील आहे. शिबानीच्या वेगवेगळ्या लूकनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या फोटोंना मिळणाऱे लाईक्स, आणि कमेंट्सची संख्या मोठी आहे. काही दिवसांपासून शिबानी आणि फरहानच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले आहेत.

Shibani Dandekar
पठ्ठ्याचे ६ वेगवेगळ्या भाषेत रिपोर्टिंग, पाहा पत्रकाराचा Viral Video

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com