#ShilpaTrophyVapasKaro: म्हणे सिध्दार्थ जिंकला तर मी...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

शिल्पाने काही दिवसापूर्वी सिद्धार्थवर गंभीर आरोप केले होते. त्यावेळी एका नुज्य चॅनला मुलाखत देताना म्हणाली होती, ''जर बिगबॉसच्या या सिझन विनर होणार असले तर माझी सिझन 11 ची ट्रॉफी परत घ्या. मला नको आहे ही ट्रॉफी. मला बिगबॉसची विनर नाही बनायचे". आता सिध्दार्थ शुक्ला सिझन 13 चा विनर बनला आहे. त्यानंतर या वक्तव्यावरुन शिल्पा शिंदेवर नाराज सिध्दार्थच्या फॅन्सने सोशल मीडियावर #ShilpaTrophyVapasKaro असा हॅशटॅग ट्रेंड सुरू केला आहे. सिद्धार्थच्या फॅन्सनी शिल्पाला तिची बिग बॉस 11 ची ट्रॉफी परत देण्याची मागणी केली आहे. 

पुणे  : कॉन्ट्रवर्शिल शो म्हणून ओळख असणाऱ्या बिगबॉसचे नुकतेच 13 वा सिझन संपला. बिगबॉसच्या या सिझनने टीआरपीचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केले असून हा सिझन आतापर्यंत सर्वाधिक लोकप्रिय ठरला आहे.बिगबॉसचा हा सिझन जितका लोकप्रिय ठरला तितकाच वादग्रस्त देखील ठरला आहे. शो संपतो ना संपतो तोच आता नवीन वादाला सुरवात झाली आहे. हा वाद बिगबॉस 13 चा विनर सिद्दार्थ शुक्ला आमि बिगबॉस 11 ची विनर शिल्पा शिंदे यांच्यात सुरु आहे. इतकेच नव्हे  तर या वादात सिध्दार्थच्या फॅन्सने शिल्पा शिंदेला ट्रोल केले आहे. #ShilpaTrophyVapasKaro असा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड  होत आहे.

'मम्मा, मला सासरी मरायचं नाही'; चिठ्ठी लिहून गायिकेची आत्महत्या

शिल्पाने काही दिवसापूर्वी सिद्धार्थवर गंभीर आरोप केले होते. त्यावेळी एका नुज्य चॅनला मुलाखत देताना म्हणाली होती, ''जर बिगबॉसच्या या सिझन विनर होणार असले तर माझी सिझन 11 ची ट्रॉफी परत घ्या. मला नको आहे ही ट्रॉफी. मला बिगबॉसची विनर नाही बनायचे". आता सिध्दार्थ शुक्ला सिझन 13 चा विनर बनला आहे. त्यानंतर या वक्तव्यावरुन शिल्पा शिंदेवर नाराज सिध्दार्थच्या फॅन्सने सोशल मीडियावर #ShilpaTrophyVapasKaro असा हॅशटॅग ट्रेंड सुरू केला आहे. सिद्धार्थच्या फॅन्सनी शिल्पाला तिची बिग बॉस 11 ची ट्रॉफी परत देण्याची मागणी केली आहे. 

माधुरी दीक्षितच्या पहिल्या हिरोचे निधन

बिग बॉसच्या 13 च्या फिनालेच्या एक दिवस आधी शिल्पाने तिच्या आणि सिद्धार्थच्या रिलेशनचा खुलासा केला होता. शिल्पा आणि सिद्धार्थ रिलेशनमध्ये असताना वाईटपद्धतीने वागणूक करत असल्याचा आरोप केला होता. इतकेच नव्हे तर, अनेकदा सिद्धार्थने मारहाण केल्याचंही शिल्पाने सांगितलं. शिल्पाच्या या वक्तव्यानंतर मात्र सिद्धार्थचे फॅन्स चांगलेच भडकले आहेत. त्यामुळे सध्या #ShilpaTrophyVapasKaro हा हॅशटॅग सोशल मीडियावर खूप ट्रेंडिंग आहे. सिध्दार्थच्या फॅन्सनी शिल्पाच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत ती खोटे आरोप करत असल्याचे चाहत्यांनी म्हटलं आहे. 

Bigg Boss 13 :...यांनी गाजविला बिग बॉसचा 13वा सीझन

बिग बॉस 13च्या फिनालेनंतर शिल्पाच्या या आरोपाबाबत सिध्दार्थला विचारले असता, तो म्हणला, ''शिल्पाला आपण खूप चांगले ओळखत असून तिने अशाप्रकारे का आरोप केले याची आपल्याला काहीच माहिती नाही''  

फिल्मफेअरमध्ये असं काय घडलं की गीतकार म्हणाला, 'अलविदा अॅवॉर्ड्स' 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shilpa Shinde troll On Twitter by Siddhart shukla fans