Big Boss 16 Final: शिवनं दाखवला मनाचा मोठेपणा! डोळे भरुन आले, पण... |Shiv Thakare Viral Post | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bigg Boss 16 Shiv Thakare Viral Post

Shiv Thakare Viral Post : शिवनं दाखवला मनाचा मोठेपणा! डोळे भरुन आले, पण...

Shiv Thakare bigg boss 16 runner up mc stan post : बिग बॉसच्या १६ व्या सीझनमध्ये सलमाननं एमसी स्टॅनच्या नावाची घोषणा केली आणि शिवचे डोळे भरुन आले. विजेतेपद जाहीर करण्यापूर्वी या दोन्ही मंडलींनी निकाल काहीही असो जिंकणारा व्यक्ती हा मंडलीचा असणार आहे याचा त्यांना विशेष आनंद होता.

मात्र प्रत्यक्षात आता सोशल मीडियावर जे काही सुरु झाले त्यावरुन वेगळ्याच चर्चेला तोंड फुटले आहे. त्यामध्ये नेटकऱ्यांनी शिवचं कौतूक करुन त्याला आधार देण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रसिद्ध रॅपर एमसी स्टॅनच्या नावावर बिग बॉसच्या यंदाच्या सीझनचा विजेता म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आले खरे. मात्र लाखो नेटकऱ्यांच्या मनात तर शिव ठाकरेचे नाव होते.

शेवटच्या फेरीमध्ये प्रियंका आणि शिव ठाकरे यांच्यात चुरस असेल असा बऱ्याचजणांचा आग्रह होता. मात्र जे झाले त्यानं चाहत्यांना, प्रेक्षकांना मोठा धक्काच बसला होता. शिव आणि एमसी स्टॅन हे अंतिम दोन स्पर्धक होते. त्यात सलमाननं स्टॅनच्या नावाची घोषणा देखील केली.

Also Read - अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

आता सोशल मीडियावर शिवनं पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यानं जे म्हटले आहे त्यावरुन नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहे. त्या लक्ष वेधून घेणाऱ्या आहेत. शिव म्हणतो, अखेर आपण जिंकलो. याचा मला खूप आनंद आहे. विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

शिवच्या त्या पोस्टवर आतापर्यत अडीच लाखांहून अधिक लाईक्स आणि कमेंटस आल्या आहेत. एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की, शिव तू मनाचा मोठेपणा दाखवलास, पण तुला नशिबानं काही साथ दिली नाही.

शिव विजेता न झाल्यानं त्याच्या लाखो चाहत्यांची मनं दुखावली गेली आहेत. कित्येकांना त्याच्या विजयाची पूर्ण खात्री होती. मात्र जे झालं त्यावरुन वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे. नेटकऱ्यांनी वेगवेगळे प्रश्न उपस्थित करुन यापुढील काळामध्ये बिग बॉस प्रेक्षकांनी पाहावा की पाहू नये असेही नेटकऱ्यांनी विचारले आहे.

सलमाननं विजेत्याचे नाव जाहीर करण्यापूर्वी शिव आणि एमसी स्टॅनला जिंकल्यानंतर तुमची प्रतिक्रिया काय असेल असा प्रश्न विचारला होता. शिवनं कुणीही जिंकलं तरी मंडलीचाच विजेता होणार आहे याचा आम्हाला आनंद आहे. असे म्हटले होते.

प्रियंका आणि शिवमध्ये चुरस होती खरी पण एमसी स्टॅननं त्यात दोघांनाही पिछाडीवर सोडत बाजी मारली. शिवच्या त्या पोस्टनं नेटकऱ्यांसमोर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

शिवनं आपल्या मनाचा उमदेपणा दाखवत एमसी स्टॅनच्या जेतेपदावर आनंद व्यक्त केला आहे. त्यानं आपल्या मित्राला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत.

त्यानं यापूर्वी जी प्रतिक्रिया दिली होती त्यामध्ये म्हटले होते की, मी शंभर टक्के जिंकण्याचा प्रयत्न केला. मी खेळाच्या भावनेनं सहभागी होती. एमसी स्टॅन हा रियल ठरला. या शब्दांत शिवनं आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.