शिवाजी साटम यांनी 'दे धक्का २' चित्रपटाचे पोस्टर केले ट्विट, म्हणाले -

दे धक्का २ विनोदाची हमी....
Shivaji Satam And De Dhakka 2
Shivaji Satam And De Dhakka 2 esakal

De Dhakka 2 : महेश मांजरेकर यांचा 'दे धक्का' या चित्रपटाने प्रेक्षकांचा निखळ मनोरंजन केले होते. अनेकांना यातील कलाकारांची भूमिका मनापासून आवडली होती. त्यात मकरंद अनासपूरे आणि सिद्धार्थ जाधव म्हटल्यावर हस्यविनोद आणि भावनिक क्षणांची वेगळी अनुभूती मिळून गेली. तर हे सर्व सांगावे लागले कारण दे धक्का दुसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वी महेश मांजेरकर (Mahesh Manjrekar) यांनी 'दे धक्का २' चा टिजर सोशल मीडियावर शेअर केला होता. (Shivaji Satam Share De Dhakka 2 Marathi Movie Poster And Say De Dhakka 2 Guaranteed Fun)

Shivaji Satam And De Dhakka 2
लठ्ठपणाने तिला दिला आत्मविश्वास, अक्षय कुमारबरोबर 'या' चित्रपटात झळकणार !

महेश मांजरेकर आपल्या १० जुलैच्या ट्विटमध्ये म्हणतात, आज पंढरीची वारी, ५ ऑगस्ट दिग्दर्शित 'दे धक्का २' (De Dhakka 2) तुमच्या जवळच्या सिनेमागृहात ५ ऑगस्टपासून. थांबायचं नाय, गड्या थांबायच नाय, घाबरायचं नाय, गड्या घाबरायचं नाय !

#देधक्का२ #पुन्हादेधक्का #DeDhakka2 #PunhaDeDhakka

या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर यांनी केले असून निर्माता अमेय खोपकर आहेत.

Shivaji Satam And De Dhakka 2
वयाच्या ८० व्या वर्षी अमिताभ बच्चन यांचे गुजराती सिनेमात पदार्पण

चित्रपटातील अभिनेता शिवाजी साटम (Shivaji Satam) यांनी दे धक्का २ या चित्रपटाविषयी ट्विट केले आहे. ट्विटबरोबर त्यांनी चित्रपटाचे पोस्टरही शेअर केले आहे. ते म्हणतात, दे धक्का २ विनोदाची हमी. सर्वात लोकप्रिय सुंदर सदाबहार विनोदी दे धक्काचा दुसरा भाग. (Marathi Movie Updates)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com