लॉकडाऊनमध्ये घडलेल्या घडामोडींवर आला लघुपट; जाणून घ्या काय आहे तर...

love quarantine
love quarantine

मुंबई : कोरोनामुळे जगात विविध चांगल्या किंवा वाईट घडामोडी घडल्या आहेत. त्यापैकी काही बाबी जगासमोर आल्या. मात्र काही घडामोडींबद्दल कोणालाही माहिती नाही. कोरोनाच्या या परिस्थितीचं चित्रण बॉलिवूड करणार नाही तर नवलच...! निर्माते निलेश एन. रघानी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवरचे काही अनुभव आणि घडलेल्या घडामोडीचे चित्रण आपल्या 'लव्ह इन क्वारंटाईन' या लघुपटात केले आहे. 

कोरोनाच्या महामारीमध्ये पालिकेचे कर्मचारी तसेच कामगार तसेच पोलिस आणि विशेष म्हणजे डॉक्टर्स, नर्सेस तसेच आरोग्य कर्मचारी यांचे मोठे योगदान राहिलेले आहे. या सगळ्यांचे विविध अनुभवांचे अवलोकन करण्यात आल्यानंतर हा लघुपट बनविण्यात आला आहे. हा लघुपट एक हजार डॉक्टर्सना दाखविण्यात आला आणि आता तो ओटीटीवर प्रदर्शित करण्यात येणार आहे.

डॉक्टर्स, नर्सेस तसेच पोलिस आणि पालिका कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या काळात केलेले काम आणि त्यांना कराव्या लागलेल्या संकटांचा सामना असे विविध अनुभव यामध्ये आहेत. एन. आर. ग्रुप प्रेझेन्टस व क्लासिक ट्रेजर यांच्या संयुक्त विद्यमाने या फिल्मची निर्मिती करण्यात आली आहे. याचे कथानक आणि दिग्दर्शन राजीव राजीव एस. रुईया यांचे आहे. या फिल्मचे प्रोजेक्ट डिझायनर दीपक रुईया, डीओपी जावेद एहतेशाम यांचे आहे. फिल्ममध्ये मुख्य भूमिकेत ऋतू जेंजानी आणि करण उदय जेंजानी हे आहेत.

निर्माते नीलेश रघानी म्हणाले, की लॉकडाऊनमध्ये आम्ही बारकाईने अवलोकन केले. सर्व टीमने घरी बसून काम केले. गरजेनुसार सरकारी यंत्रणांच्या पूर्व परवानगीने सर्व काही केले असून प्रेक्षकांनी नक्कीच ही कलाकृती बघावी अशी आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com