सिद्धू मुसेवालाचे वडील म्हणाले, मुलाच्या हत्येमागे गायक व राजकारणी; लवकरच...

सिद्धूच्या गाण्यांबाबत एका गटाने सर्वांची दिशाभूल केल्याचे म्हटले आहे
Sidhu Moose wala Latest News
Sidhu Moose wala Latest NewsSidhu Moose wala Latest News

Sidhu Moose wala Latest News पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) याच्या हत्येमागे (Murder) काही गायक (singer) आणि राजकीय लोकांचा हात असल्याचा दावा वडील बलकार सिंह यांनी हत्येला ८० दिवस उलटल्यानंतर केला आहे. सोबतच याचा लवकरच खुलासा करणार असल्याचेही वडील बलकार सिंह यांनी सांगितले आहे.

रविवारी हजारो लोक सिद्धू मुसेवालाच्या घरी आई-वडिलांना भेटण्यासाठी आले होते. यावेळी दिवंगत गायकाच्या वडिलांनी लोकांना संबोधित करताना सांगितले की, आपल्या मुलाने अल्पावधीतच अधिक प्रगती केल्याने बळी गेला. सिद्धूच्या हत्येसाठी (Murder) काही गायक (singer) जबाबदार आहेत. ज्यांना सिद्धूने चांगले गाणे म्हणणे आवडत नव्हते. परंतु, सिद्धूला (Sidhu Moose Wala) मारणारे हे गायक कधीच प्रगती करणार नाहीत.

Sidhu Moose wala Latest News
Film Shooting And Tourist Spot : चित्रपटांनी प्रसिद्ध केली काही प्रेक्षणीय स्थळे

सिद्धू मुसेवालाचे वडील बलकार सिंह यांनी सिद्धूच्या गाण्यांबाबत एका गटाने सर्वांची दिशाभूल केल्याचे म्हटले आहे. सरकारचीही दिशाभूल झाली. त्याने एका गाण्यात ‘जे आपल्या कुटुंबाची काळजी घेऊ शकत नाहीत, ते मला सल्ला देतात’ असे म्हटले होते. याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला, असेही ते म्हणाले.

सिद्धूला छोट्याशा कारकिर्दीत मिळालेल्या प्रसिद्धीमुळे काही लोकांची इच्छा होती की, सिद्धू जे काही करो ते त्यांच्या माध्यमातून करो. परंतु, तो जोपर्यंत राहिला आपल्या बळावर राहिला. माझेपण जेवढे आयुष्य आहे ते मी असेच जगेन. सिद्धू कॅनडात शिकण्यासाठी गेला होता तेव्हा काही चुकीचे लोक त्याच्यापासून फायदा शोधत होते. लवकरच मुलाच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या सर्वांची नावे लोकांसमोर ठेवतील, असेही सिद्धूच्या वडिलांनी घरी उपस्थित लोकांना सांगितले.

Sidhu Moose wala Latest News
75 Years Of Independence : ‘या’ दिग्दर्शकांनी बदलले भारतीय सिनेमाचे चित्र

२९ मे रोजी पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील जवाहरके गावालगतच्या परिसरात पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांनी मुसेवालाची हत्या केल्याचा आरोप आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com