दोनवेळा रुग्णालयात दाखल होऊनही गायक मिलिंद इंगळेने केली कोरोनावर मात; वाचा सविस्तर...

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 29 जून 2020

कोरोनाचा संसर्ग आता दिवसेंदिवस फारच वाढत चालला आहे. सर्वसामान्यांसह नामांकित व्यक्तींनाही कोरोनाची बाधा होत आहे. कोरोनाचा हा लढा अनेकजण आपल्या इच्छाशक्ती आणि सकारात्मक विचारसरणीच्या जोरावर जिंकतही आहे.

मुंबई : कोरोनाचा संसर्ग आता दिवसेंदिवस फारच वाढत चालला आहे. सर्वसामान्यांसह नामांकित व्यक्तींनाही कोरोनाची बाधा होत आहे. कोरोनाचा हा लढा अनेकजण आपल्या इच्छाशक्ती आणि सकारात्मक विचारसरणीच्या जोरावर जिंकतही आहे. नुकतेच गायक व संगीतकार मिलिंद इंगळे यानेही कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

वारकऱ्यांची थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव, 'ही' आहे मागणी..

गायक व संगीतकार मिलिंद इंगळेला कोरोनाचा संसर्ग कसा झाला हे त्याचे त्यालाच समजले नाही. 1 मे रोजी पहिल्यांदा त्याला ताप आला होता. तो ताप अॅटिबायोटिक्सने दोन दिवसात बरा झाला. पुन्हा 11 तारखेला ताप आला आणि डॉक्टरांनी कोरोनाची चाचणी त्याला करायला सांगितली. 12 तारखेला चाचणी झाली आणि 13 तारखेला कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर मिलिंदने घरामध्येच स्वतःला क्वारंटाईन करायचे ठरविले. पण त्याच रात्री त्याला श्वास घ्यायला त्रास झाला. त्यामुळे दुसऱ्या दिवशी लगेच त्याला नानावटी रुग्णालयात दाखल व्हावे लागले. 

BIG BREAKING : ठाण्यात 2 ते 12 जुलैपर्यंत पुनश्च लॉकडाऊन; महापालिका आणि पोलिस आयुक्तांच्या बैठकीत निर्णय...

त्यानंतर 20 मे रोजी कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यामुळे त्याला घरी सोडण्यात आले. घरी आल्यावर चौदा दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहावे लागले. पण तीन-चार दिवसांनी मिलिंदला पुन्हा ताप आला. त्यामुळे पुन्हा रुग्णालयात दाखल करावे लागले. मिलिंदला अतिदक्षता विभागात ठेवावे लागले.  डॉक्टरांचे उपचार आणि इच्छाशक्तीच्या जोरावर त्याने मोठ्या जिद्दीने कोरोनावर मात केली आहे. 

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांना सैफी हॉस्पिटलमध्ये केलं ऍडमिट, कारण आहे

मिलिंद म्हणाला, की मी खूप काळजी घेत होतो. परंतु कोरोनाची लागण कुठे आणि कशी झाली ते माझे मलाच समजले नाही. मात्र मी सकारात्मक विचार केला आणि कोरोनावर मात केली. कोरोना झाला तरी कुणीही घाबरून जाऊ नये, मनात सकारात्मक विचार ठेवावा आणि आपला आत्मविश्वास प्रबळ असावा. योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. 

...अन्यथा तुमची गाडी जळून खाक होऊ शकते; अग्निशमन दलाने दिला खबरदारीचा इशारा...

मला दोन वेळा रुग्णालयात दाखल व्हावे लागले. पण मी जिद्द सोडली नाही. मी नानावटीचे डॉक्टर्स आणि नर्सेस यांचे खूप आभार मानतो. माझ्या चाहत्यांचेही आभार मानतो. त्यांच्या प्रेमामुळेच आज पुन्हा उभा आहे. माझे नातेवाईक आणि इमारतीतील सगळ्यांनी चांगले सहकार्य केले.  माझी पत्नी मानसी आणि मुलगा सुरेल यांनी खूप धडपड आणि कष्ट घेतले. या सगळ्या मंडळींच्या सहकार्यामुळे मी कोरोनावर मात केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Singer milind ingale beats corona even after admitted to hospital for two times