'हरिव्दारला गेले होते त्यावेळी तिथे मंदिरात माझ्यासोबत'...

Singer Neha Bhasin share sexual harreshment experience in interview
Singer Neha Bhasin share sexual harreshment experience in interview

मुंबई - बॉलीवूडमधल्या अनेक अभिनेत्रींनी आजवर आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराविषयी लिहिले आहे. सोशल मीडियावर अनुभव व्यक्त केले आहेत. त्यातील कित्येकांना आपल्या लहानपणीच एका वेगळ्या प्रसंगाला सामोरं जावं लागलं आहे.

सध्याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला वाचा फोडण्याचे काम केलं जात आहे. यापूर्वीही मोठमोठ्या सेलिब्रेटींनी लहानपणी आपल्यावर ओढावलेल्या त्या प्रसंगाविषयी सांगितलं आहे.अशाच एका घटनेविषयी सुल्तान फेम सिंगर नेहा भसीनने तिला लहानपणी आलेल्या विदारक अनुभव शेयर केले आहेत. त्या कोवळ्या वयात आपल्यावर झालेल्या त्या प्रसंगामुळे भविष्यात फार जपून वागावे लागले. तो प्रसंग अद्याप मनाच्या एका कोप-यात घर करुन आहे.

नेहा भसीन कोण असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर तुम्हाला तिची ओळख करुन द्यावी लागेल. सलमानचा सुल्तान, टाइगर जिंदा है आणि भारत आठवतोय त्यात गाणी गायलेली गायिका म्हणून नेहा प्रसिध्द आहे. नेहाने एका मुलाखती दरम्यान आपल्याला आलेल्या कटू अनुभवाविषयी सांगितले. ती म्हणाली, 10 वर्षांची असताना आपल्यासोबत जे घडलं ते अतिशय भयानक होतं.नेहाने सांगितले की, त्यावेळी मी फक्त 10 वर्षांचे होते.

मी आणि आई आम्ही दोघे हरिद्वारला गेलो होतो. आई माझ्यापासून थोडी लांब होती. त्यावेळी एका अनोळखी व्यक्तीने मला चुकीच्या पध्दतीने स्पर्श केला. ते मला फार किळसवाणे वाटले. मला त्या व्यक्तीचा रागही आला होता.

काही वर्षांनंतर एका हॉलमध्ये अन्य एका माणसाने माझ्यासोबत असभ्य वर्तन केले. यावेळी मला असे जाणवायचे की यात माझेच काही चुकत असेल त्याशिवाय़ कोणी असे करणार नाही.

प्रत्यक्षात मी माझ्या जागी योग्य होते. त्या माणसांना अद्दल घडविण्याची गरज होती.याप्रकारच्या घटनांमुळे आपल्याला त्याविरोधात लढण्याची प्रेरणा मिळाली. एका गाण्यातून तिने आपली वेदना मांडली आहे.  'कहे दे रहे दे' गाण्यातून तिने  महिलांविषयी समाज अद्याप प्रतिगामी आहे हे तिने दाखवून दिले होते.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com