महिलांना मारहाण करणारा..., सलमान खानवर अभिनेत्रीने केला गंभीर आरोप | Somy Ali Comment On Salman Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Salman Khan And Somy Ali

महिलांना मारहाण करणारा..., सलमान खानवर अभिनेत्रीने केला गंभीर आरोप

Somy Ali Comment On Salman Khan : बाॅलीवूड अभिनेत्री सोमी अलीने दबंग अभिनेता सलमान खानवर निशाणा साधला आहे. सोमी अली ही सलमानची एकेकाळची गर्लफ्रेंड राहिलेली आहे. दोघांच्याही अफेअरचीही बरीच चर्चा झाली होती. सोमी अलीने (Somy Ali) आता आपल्या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर करुन सलमान खानवर (Salman Khan) महिलांना मारहाण करण्याचा आरोप केला आहे. मात्र तिने नंतर आपली पोस्टही डिलिट केली.

हेही वाचा: Salman Khan ने शेअर केला 'HOT' शर्टलेस फोटो आणि चाहत्यांना म्हणाला...

सोमी अलीचा सलमानवर आरोप

सोमी अलीने सलमान खानचा चित्रपट 'मैंने प्यार किया'चा एक पोस्टर शेअर करुन दबंग खानवर आरोप केला आहे. सोमीने आपली पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, तिने प्रत्येकाला हैरान केले. अभिनेत्रीने सलमानच्या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत म्हणाली, महिलांना मारहाण करणारा. मीच नव्हे तर अनेकांबरोबर हे घडले. त्याची पूजा बंद करा. तो मानसिकदृष्ट्या आजारी असून सेडिस्टिक आहे. तुम्हा लोकांना याचा अंदाज नाही. (Bollywood News)

हेही वाचा: Randeep Hooda : रणदीप हुड्डाने गाड्या पुसण्यापासून ते हाॅटेलमध्ये केलयं काम

सोमी अलीची पोस्ट समोर येता सोशल मीडियावर व्हायरल झाली. सोमीने कॅप्शनने प्रत्येकाला दंग करुन दिले. मात्र अभिनेत्रीने आता स्वतःच्या इन्स्टाग्रामवरुन हटवले आहे. पोस्ट हटवण्यामागे कारण तिलाच माहीत असेल. मात्र तिच्या या पोस्टमुळे बाॅलीवूडमध्ये भूकंप माजवला आहे.