सोनम कपूरच्या सासरी कोट्यवधीची चोरी, नर्सला पतीसकट ठोकल्या बेड्या|Sonam Kapoor Bollywood Actress Robbery | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sonam Kapoor

सोनम कपूरच्या सासरी कोट्यवधीची चोरी, नर्सला पतीसकट ठोकल्या बेड्या

Bollywood News: बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) ही आता चर्चेत आली आहे. तिच्या सासरी पावणे तीन कोटी रुपयांची चोरी झाली होती. फेब्रुवारीमध्ये झालेल्या या घटनेनं सोनमला देखील मोठा धक्का बसला होता. (Bollywood Movies) याप्रकरणाची दखल घेऊन ती आणि तिचा पती यांनी दिल्ली पोलिसांकडे फिर्याद दिली होती. पोलिसांनी तातडीनं तपास करुन सोनमच्या (Entertainment News) सासरी काम करणाऱ्या नर्स आणि तिच्या पतीला बेड्या ठोकल्या आहे. विशेष म्हणजे ही गोष्ट सोनमला कळताच तिलाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. एएनआयनं ट्विट करुन ही माहिती दिली आहे. सोशल मीडियावर ही बातमी व्हायरल झाली आहे.

सोनमच्या सासरच्या घरात काम करणारी नर्स अपर्णा आणि तिचा पती नरेश यांना पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनी संगनमतानं सोनमच्या घरी पावणे तीन कोटी रुपयांची चोरी केल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. त्या नर्सला सोनमच्या आजी सासूच्या काळजी घेण्यासाठी ठेवण्यात आले होते. अपर्णानं घरातील सर्व व्यक्तींचा विश्वास संपादन करुन पतीच्या मदतीनं चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणाची माहिती एएनआयनं ट्विट करुन दिली आहे. त्यात लिहिलं आहे की, सोनम कपूरच्या सासरी 2.40 कोटींची जी चोरी झाली होती त्याप्रकरणात नर्स अपर्णा आणि नरेश यांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा: Video Viral: असशील 'KGF2' चा मोठा स्टार बरं मग?, यशनं मागितली माफी

आनंद आहुजा यांची आजी सरला आहुजा यांनी सांगितलं की, हा प्रकार अकरा फेब्रुवारीला घडला होता. रक्कम मोठी असल्यानं आम्ही घाबरुन गेलो होतो. कपाटात काही दागिने त्याचबरोबर कॅश चेक यांचा समावेश होता. ते सगळं गायब झालं. त्यानंतर तुघलक रोड येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. ही एक हायप्रोफाईल केस होती. त्यामुळे दिल्लीतील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यात जातीनं लक्ष दिलं. त्यासाठी पोलिसांची एक वेगळी टीम देखील तयार करण्यात आली होती. दरम्यान पोलिसांनी घरातील 25 नोकर, 9 केअर टेकर, वाहनचालक आणि बागकाम करणाऱ्या व्यक्ती यांची कसून चौकळी केली होती. त्यानंतर पोलिसांनी रात्री सरिता विहार येथे छापेमारी करुन अपर्णा आणि तिच्या पतीला अटक केली.

हेही वाचा: KGF 2 Song Viral: यशचा 'सुलतान' अवतार नेटकऱ्यांना भावला, सोशल मीडियावर चर्चा

Web Title: Sonam Kapoor Bollywood Actress Robbery Case Delhi Police Arrested Nurse Husband

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..