
Indian Idol वादात सोनू निगमची उडी; व्हिडीओ पोस्ट करत म्हणाला..
'इंडियन आयडॉल १२'च्या Indian Idol 12 वाढत्या वादात आता गायक सोनू निगमने Sonu Nigam उडी घेतली आहे. या शोमध्ये आरजे आणि किशोर कुमार Kishore Kumar यांचा मुलगा अमित कुमार Amit Kumar आल्यापासून त्याची जोरदार चर्चा आहे. या एपिसोडवर सोशल मीडियावरही टीका झाली आणि अमित कुमार यांनीसुद्धा स्पर्धकांची गाणी काही खास नसल्याचं म्हटलं. इतकंच नव्हे तर निर्मात्यांनी सांगितल्यामुळे स्पर्धकांचं कौतुक केलं, असंही ते म्हणाले होते. आता सोनू निगमने या वादावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी अमित कुमार यांची बाजू घेतली आहे. (Sonu Nigam reacts to Indian Idol row says undue advantage is being taken of Amit Kumars silence)
"अमित कुमार ही खूप मोठी व्यक्ती आहे. सर्वांत पहिली गोष्टी म्हणजे ते आमच्या उस्ताद म्हणजेच किशोर कुमार यांचे पुत्र आहेत. त्यांनी आमच्यापेक्षा जास्त ही इंडस्ट्री पाहिली आहे. आमच्यापेक्षा अधिक जग त्यांनी पाहिलंय. अत्यंत साध्या स्वभावाची व्यक्ती आहे ती. कधीच कोणाला काही बोलत नाहीत. त्यांच्या शांततेचा तुम्ही फायदा घेत आहात", असं म्हणत सोनूने माध्यमांना आणि इंडियन आयडॉलला हा वाद संपवण्याची विनंती केली. त्याचप्रमाणे स्पर्धकांना प्रोत्साहित करण्यासाठी अमित कुमार यांना निर्मात्यांनी विनंती करणं काहीच चुकीचं नसल्याचं त्याने म्हटलं.
हेही वाचा: 'इंडियन आयडॉल'च्या परिक्षकांना मिळतं तब्बल इतकं मानधन
हेही वाचा: Indian Idol 12: टीमचा मोठा निर्णय; सर्व स्पर्धकांची घरवापसी
"स्पर्धकांचं कौतुक करा म्हणाले आणि मी तेच केलं, असं अमितजी म्हणाले. याचा अर्थ असा आहे की त्यांनी त्यांच्यावर टीका केली नाही. यात कोणाचीच चूक नाही. पण या वादाचा फायदा जे लोक घेत आहेत ते चुकत आहेत", असं सोनू पुढे म्हणाला. "अमित कुमारजी हे खूप मोठे आहेत आणि आपल्या संस्कृतीत मोठ्यांचा आदर केला जातो", असा सल्लाही त्याने सूत्रसंचालक आदित्य नारायणला दिला. सोनू निगमच्या या व्हिडीओला गायक अभिजीत भट्टाचार्य आणि कुमार सानू यांच्याकडून पाठिंबा मिळाला.
Web Title: Sonu Nigam Reacts To Indian Idol Row Says Undue Advantage Is Being Taken Of Amit Kumars
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..