Ram Charan Birthday : बिजनेस, एअरलाइन्स अन् हॉस्पिटल...राम चरण फक्त हिरोच नव्हे तर आहे बिजनेसचाही बाप

आज राम चरणच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या लक्झरी लाइफस्टाइलबाबत जाणून घेऊया
Ram Charan Birthday
Ram Charan Birthdayesakal

Ram Charan Birthday : दक्षिण भारतात ज्याची देवाप्रमाणे पूजा केली जाते असा प्रसिद्ध कलाकार म्हणजे राम चरण. त्याचा जन्म १९८५ मध्ये झाला. संपूर्ण जग या कलाकाराला अभिनेता म्हणून बघत असलं तरी याव्यतिरिक्त त्याचे अनेक व्यवसाय आहेत. आज राम चरणच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या लक्झरी लाइफस्टाइलबाबत जाणून घेऊया.

राम चरणने त्याच्या कलेने आणि साधेपणाने लोकांना अशाप्रकारे त्याच्या प्रेमात वेडे केले आहे की आज कोट्यावधी लोक त्याचे जबरे फॅन झाले आहेत. जन्माताच चांदीचा चमचा नशिबी येणाऱ्या रामचरणने कधी त्यांच्या वडिलांसारखी गरीबी जवळून बघितली नसली तरी यशाची किंमत मात्र त्याच्या जीवनात मोठी आहे.

रामचरणच्या वडिलांनी एके काळी आयुष्यात हलाखीचे दिवस बघितले होते. मात्र राम चरणननेही इंडस्ट्रीत यश मिळवण्यासाठी फार कष्ट घेतलेत. आणि आज इंडस्ट्रीत स्वत:ची एक खास ओळख तयार केली. राम चरण याची गिनती साउथच्या सगळ्यात श्रीमंत अभिनेत्यांमध्ये केली जाते. त्याची श्रीमंती ही केवळ अभिनयाच्या जोरावर नसून त्यामागे बरेच व्यवसाय आहेत.

Ram Charan Birthday
Ram Charan Birthday: लग्नाचं निमित्त ठरलं समोसे आणि चटणी.. RRR सारखीच फिल्मी आहे राम चरणची लव्हस्टोरी

चिरंजीवी सारख्या सुपरस्टारच्या घरी जन्म घेऊनही राम चरणने स्वत:च्या बळावर विश्व उभारण्याचा मार्ग निवडला. शिक्षण घेतल्यानंतर राम चरणने सिनेमाच्या जगतात पाऊल ठेवलं. आणि त्याच्या अभिनयातून त्याने संपूर्ण जग जिंकलं.

विशेष म्हणजे राम चरणने १५-१६ वर्षांच्या करियरमध्ये फक्त १६ चित्रपटांमध्ये काम केले आहे मात्र तरीदेखील तो गोल्डन बॉयच्या नावाने ओळखला जातो. कधी त्याचा आलिशान बंगला चर्चेत असतो तर कधी त्याच्या लक्झरी गाड्यांचे कलेक्शन. बॉक्स ऑफिसमध्ये कमाल करणारा राम चरण एकूण १३०० कोटींच्या संपत्तीचा मालक आहे.

एअरलाइन्स कंपनी ते पोलो रायडिंग क्लब, डेविल्स सर्किट, कोनिडेला प्रोडक्शन कंपनी, ऑब्सटेकल रनिंग सीरीज पर्यंतच्या मोठ्या कंपनीजच्या शेअर्समध्ये राम चरणचा वाटा आहे.

Ram Charan Birthday
Ram Charan Birthday: बंगला आहे...गाडी आहे...बँक बॅलन्स आहे...राम चरणाकडे आहे कोट्यवधींची संपत्ती

वर्ष २०१३ मध्ये राम चरणने एका एअरलाइन कंपनी टूजेट ची सुरुवात केली होती. या कंपनीत तो डायरेक्टर म्हणून कार्यभार सांभाळतो. तो एक यशस्वी डायरेक्टरसुद्धा आहे.

एअरलाइन सर्व्हिस सांभाळण्याऱ्या राम चरणला तुम्ही बऱ्याच चित्रपटांमध्ये घोडेसवारी करताना बघितलं असेल. त्याला रीयल लाइफमध्येही ते फार आवडते. तो एका पोलो टीमचा मालकही आहे.

राम चरण ब्रँड एंड्रॉसमेंटमधूनही बरेच पैसे कमावतो. अभिनेता अपोलो जिओ, टाटा डोकोमो, वोलाना आणि पेप्सी सारख्या ब्रँडच्या जाहिराती करतो. यात एका जाहिरातीतून त्याची जवळपास दो कोटींची कमाई होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com