esakal | AR रहमानचं नवं गाणं लाँच; यूट्यूबवर Allipoola Vennela चा धुमाकूळ I Bathukamma Festival
sakal

बोलून बातमी शोधा

A. R. Rahman
दिग्दर्शक गौतम वासुदेवसोबत ए. आर. रहमाननं हे गाणं तयार केलंय.

AR रहमानचं नवं गाणं लाँच; यूट्यूबवर Allipoola Vennela चा धुमाकूळ

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गायक आणि संगीतकार ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांचं Allipoola Vennela गाणं नुकतच रिलीज झालंय. बाथुकम्मा महोत्सवाच्या निमित्तानं हे गाणं यूट्यूबवर चांगलंच धुमाकूळ घालतंय. याची खास गोष्ट म्हणजे, हा म्युझिक व्हिडिओ माजी संसदीय सदस्य कलवकुंतला कविता (Kalvakuntla Kavitha) यांनी लाँच केलाय. त्या तेलंगणा जागृती समितीच्या सदस्या आहेत.

दिग्दर्शक गौतम वासुदेवसोबत ए. आर. रहमाननं हे गाणं तयार केलंय. गौतम वासुदेव चित्रपट निर्माते आहेत. हे गाणं तेलंगणा जागृती निर्मित असून तेलंगणामध्येच या गाण्याचा म्युझिक व्हिडिओ शूट करण्यात आलाय. बाथुकम्मा महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी हे गाणं यूट्यूबवर रिलीज करण्यात आलं. त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. या गाण्यात पारंपरिक गोष्टींचा समावेश करण्यात आला असून यात प्रत्येकजण उत्सवाच्या तयारीत व्यस्त असल्याचे दिसते, तर सेटवर फुले आणि रांगोळ्या काढून याचं सुंदर चित्रीकरण करण्यात आलंय. हे गाणं पुरस्कार विजेते ए. आर. रहमान यांनी संगीतबद्ध केलंय, तर उत्तरा उन्नीकृष्णन (Uthara Unnikrishnan) यांनी गायलंय. मित्तपल्ली सुरेंदर (Mittapalli Surender) यांनी हे गाणं लिहिलंय. यासह गाण्याचं राष्ट्रीय पुरस्कार विजेती ब्रिंदा यांनी नृत्यदिग्दर्शन केलंय.

हेही वाचा: उर्दूचा गोडवा

बाथुकम्मा महोत्सव तेलंगणाचा (Bathukamma festival) एक भाग आहे आणि तिथल्या संस्कृतीची ही ओळख आहे. तेलंगणा चळवळीची मुळे मजबूत करण्यात कवितांनी महत्त्वाची भूमिका बजावलीय. दिग्दर्शक गौतम वासुदेव मेनन आणि तेलंगणा जागृती यांच्या संयुक्त विद्यमानं संगीतकार रहमान यांनी उत्सवाच्या वातावरणात या गाण्याच्या निमित्तानं चांगलीच भर घातलीय. रहमाननं हे गाणं रिलीज होण्यापूर्वी या गाण्याविषयी ट्विटव्दारे माहिती दिली होती.

हेही वाचा: एकदम कडक! सुपरमॉडेल की सुपरस्टार? गोल्डन बॉयच्या Style वर तरुणी फिदा

loading image
go to top