बाहुबली, RRR पेक्षा मोठा धमाका करणार राजामौली; मोठा खुलासा करत म्हणाले,'आता मी..'

साऊथ सुपरस्टार महेश बाबूसोबत करत असलेल्या सिनेमाचा जॉनर राजामौलींनी सांगितल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता मात्र वाढली आहे.
S.S.Rajamouli reveals mahesh babu film genre is globetrotting action adventure
S.S.Rajamouli reveals mahesh babu film genre is globetrotting action adventureGoogle

S.S.Rajamouli: बाहुबली आणि RRR सारखे ब्लॉकबस्टर सिनेमे दिग्दर्शित केलेल्या राजामौली यांच्या आगामी सिनेमाची चाहते अगदी चातकासारखी वाट पाहत आहेत. कारण राजामौली काहीतरी करणार म्हणजे लार्जर दॅन लाइफचा अनुभव असणार हे नक्की. यावेळी राजामौली साऊथ सुपरस्टार महेश बाबूसोबत सिनेमा बनवण्याची तयारी करत आहेत. ही बातमी याआधीही आलीय पण नुकताच त्यांनी खुलासा केलाय तो सिनेमाच्या जॉनरविषयी. आणि याविषयी चाहत्यांना कळल्यावर त्यांची उत्सुकता आणखीनच वाढेल यात शंका नाही. कारण राजामौलींनी याआधी बाहुबली आणि RRR सारखे सिनेमे बनवून चाहत्यांना काहीतरी भन्नाट,हटके पहायची सवय लावली आहे.(S.S.Rajamouli reveals mahesh babu film genre is globetrotting action adventure)

S.S.Rajamouli reveals mahesh babu film genre is globetrotting action adventure
'देवमाणूस ३?',किरण गायकवाडनं दिली हिंट...

एस.एस.राजामौली यांचा RRR बॉक्सऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. यामध्ये रामचरण आणि ज्युनिअर एनटीआर मुख्य भूमिकेत होते. तर आलिया भट्ट आणि अजय देवगण यांच्यादेखील भूमिका तितक्याच महत्त्वाच्या होत्या भले त्यांचा रोल छोटा होता तरी. राजामौली यांनी याआधी प्रभास सोबत बाहुबली हा सिनेमा बनवला होता. याचे दोन्ही भाग सुपरहिट ठरले. आता राजामौली तिसरा सिनेमा महेश बाबू सोबत करत आहेत.

S.S.Rajamouli reveals mahesh babu film genre is globetrotting action adventure
हास्यजत्रा सोडून प्राजक्ता मित्रासोबत लंडनला

राजामौली यांनी काही दिवसांपूर्वीच USA मध्ये एका फिल्म फेस्टिव्हलला हजेरी लावली होती, तिथे RRR सोबतच इतरही अनेक सिनेमे दाखवले गेले. यादरम्यानच राजामौलींना त्यांच्या या तिसऱ्या सिनेमाविषयी विचारले गेले. तेव्हा ते म्हणाले,''महेश बाबू सोबत माझा आगामी सिनेमा हा एक ग्लोबट्रोटिंग Action Adventure वर आधारित असणार आहे''. याचा स्पष्ट अर्थ आहे की जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी सिनेमाचं कथानक सेट करण्याचं काम सुरु झालेलं असणार. महेश बाबूला या अशाप्रकारच्या अॅक्शनपटात पाहणं खरंच खूप इंट्रेस्टिंग असणार आहे.

S.S.Rajamouli reveals mahesh babu film genre is globetrotting action adventure
Emmy Awards 2022:भारतात ट्रेन्डिंगला असलेल्या सीरिजचा डंका,जाणून घ्या विजेते

जशी ही बातमी समोर आली तसं ट्वीटरवर #SSRajamouli आणि #MaheshBabu ट्रेंड व्हायला लागलं आहे. चाहते सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या प्रतिक्रिया नोंदवताना दिसत आहेत. राजामौली यांच्या या आणखी एका नवीन अॅक्शनपटाविषयी ऐकल्यावर चाहत्यांच्या आनंदाला पारावर राहिलेला नाही. बातमीत चाहत्यांचे काही ट्वीट जोडत आहोत.

राजामौली यांनी खूपआधी महेश बाबू सोबत आपण सिनेमा करणार हे सांगितले होते. या सिनेमाची निर्मिती केएल नारायण करत आहेत. याचं शूटिंगही याच वर्षात सुरु होणार आहे. चाहत्यांचे म्हणणे आहे की तेलुगुतील सर्वात मोठा अभिनेता आणि सर्वात मोठा दिग्दर्शक एकत्र येऊन सिनेमा करणार म्हणजे धमाका होणार,काहीतरी ग्रेट अनुभवण्यास मिळणार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com