दिग्गज परीक्षकांच्या साथीने रंगणार ''मी होणार सुपरस्टार', या पर्वात आहे.. | Me Honar Superstar Uopcoming Season | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'Me Honar Superstar' TV show Updates

दिग्गज परीक्षकांच्या साथीने रंगणार ''मी होणार सुपरस्टार', या पर्वात आहे..

स्टार प्रवाहच्या (star pravah ) मी होणार सुपरस्टार 'छोटे उस्ताद' या पर्वाचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. या पर्वात शुद्धी कदमने आपल्या दमदार गायकीने विजय मिळवला. प्रेक्षकांनीही या पर्वावर भरभरून प्रेम केले. छोट्या उस्तादांच्या या धमाकेदार पर्वानंतर आता आगळीवेगळी संकल्पना घेऊन स्टार प्रवाह वाहिनी पुढे आली आहे. 'मी होणार सुपरस्टार' या सांगीतिक कार्यक्रमाचे नवे पर्व हे सर्वांसाठी असणार आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत म्हणजेच ४ ते ७० या वयोगटातील स्पर्धकांना आपलं टॅलेण्ट दाखवण्याची संधी मिळणार आहे. ('Me Honar Superstar' Upcoming Season)

हेही वाचा: RRR ON OTT: आरआरआर ओटीटीवर 'त्या'च दिवशी का येतोय, काय आहे कारण?

या पर्वाला परीक्षकही अत्यंत दिग्गज असे लाभले आहे. डॉ. सलील कुलकर्णी, बेला शेंडे, आदर्श शिंदे परिक्षणाची धुरा सांभाळणार असून अभिनेता पुष्कर श्रोत्री सूत्रसंचालनाची भूमिका पार पाडणार आहे. या कार्यक्रमाची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवड चाचणी घेण्यात आली. या निवडचाचणीला भरघोस प्रतिसाद मिळाला असून महाराष्ट्राभरातून ७१ स्पर्धकांची निवड करण्यात आली. या ७१ जणांमधून २६ स्पर्धक मेगा ऑडिशनसाठी निवडण्यात आले आहेत.

हेही वाचा: किचन कल्लाकार : या कलाकारांच्या मुलांनी उडवली धमाल, पदार्थ करताना..

‘मला सगळ्यात जास्त कौतुकाचं हे वाटतं की महाराष्ट्रात वेगवेगळ्या पद्धतीचं म्युझिक ऐकायला मिळतं. महाराष्ट्रातले संगीतप्रेमी या सगळ्या संगीताचं फ्युजन करुन काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न करत असतात. ‘मी होणार सुपरस्टार आवाज कुणाचा महाराष्ट्राचा’च्या मंचावरचं टॅलेण्ट थक्क करणारं आहे. महाराष्ट्राचं लोकसंगीत, बीटबॉक्सर्स, रॅपर्स, बॅकिंग व्होकल्स, ग्रुप सिंगिंग, सोलो, ड्युएट, हार्मनिज हे सगळं एका मंचावर ऐकायला मिळणं ही प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल. आजवर माझ्या गुरुजनांकडून मी जे शिकलो ते सारंकाही या स्पर्धकांसोबत शेअर करणार आहे.’ अशी प्रतिक्रिया परीक्षक आदर्श शिंदे यांनी दिली.

तर हे पर्व स्पर्धकांपेक्षा परिक्षकांसाठी अवघड जाणार आहे अशी भावना बेला शेंडे यांनी व्यक्त केली. वयाचं बंधन कश्यालाचा नसतं. हवं असतं ते पॅशन. त्यामुळे गाणं मग ते कोणत्याही वयोगटातील स्पर्धकाने गायलं तरी ते तुम्हाला निखळ आनंद देतं,असंही त्या म्हणाल्या. तर 'गाण्याचे वेगवगळे प्रकार या मंचावर सादर होणार आहेत आणि हेच या कार्यक्रमाचं वेगळेपण आहे,' अशी भावना सलील कुलकर्णी यांनी व्यक्त केली.’ मी होणार सुपरस्टार' आवाज कुणाचा महाराष्ट्राचा हे पर्व येत्या १४ मे पासून सुरु होत आहे.

Web Title: Star Pravah Mi Honar Superstar Avaj Kunacha Maharashtracha New Season Starting From 14 May

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top