नोरा फतेही,जॅकलिनच नाही तर सुकेशच्या केसमध्ये आणखी 4 अभिनेत्री अडकल्या- ईडीचा दावा

मनी लॉन्ड्रिंग केस प्रकरणात जेलची हवा खाणाऱ्या महाठग सुकेश चंद्रशेखर केसमध्ये सध्या एक नवा ट्वीस्ट आला आहे.
Sukesh chandrashekhar met four female actresses while he was lodged in delhi tihar- ED charge sheet
Sukesh chandrashekhar met four female actresses while he was lodged in delhi tihar- ED charge sheetEsakal
Updated on

Jacqueline Fernandez: मनी लॉन्ड्रिंग केस प्रकरणात जेलची हवा खाणाऱ्या महाठग सुकेश चंद्रशेखर केसमध्ये सध्या एक नवा ट्वीस्ट आला आहे. सुकेश चंद्रशेखर प्रकरणात नोरा फतेही आणि जॅकलीन फर्नांडिस गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत आणि आता बोललं जात आहे की तिहार जेलमध्ये सुकेशला भेटण्यासाठी आणखी चार अभिनेत्री पोहोचल्या होत्या, ज्यांना त्यानंतर महागड्या भेटवस्तू देखील देण्यात आल्या.

बोललं जात आहे की या चार अभिनेत्री ज्या मॉडेल्सही आहेत त्यांच्यामध्ये बिग बॉस फेम निकिता तंबोली,चाहत खन्ना,सोफिया सिंग आणि अरुषा पाटील यांची नावं सामिल आहेत,ज्यांनी तिहार जेलमध्ये सुकेश चंद्रशेखरची भेट घेतली होती.

सुकेशची सहकारी पिंकी ईराणीच्या मदतीनं या चार अभिनेत्रींना तिहार जेलमध्ये सुकेशला भेटण्यासाठी नेण्यात आले होते.(Sukesh chandrashekhar met four female actresses while he was lodged in delhi tihar- ED charge sheet)

Sukesh chandrashekhar met four female actresses while he was lodged in delhi tihar- ED charge sheet
नवरात्रीला गरबा क्वीन फाल्गुनीचं सरप्राइज...

पिंकीने या अभिनेत्रींना सुकेशला वेगवेगळ्या नावांनी भेटवलं होतं. या भेटीनंतर अभिनेत्रींना Gucci आणि LV सारख्या महागड्या ब्रॅन्डच्या बॅग्ज मिळाल्या होत्या. या चौघींमधील अरुषाने हे मान्य केलं आहे की तिनं पिंकीच्या माध्यमातून सुकेश चंद्रशेखरची भेट घेतली होती. पण सुकेशला आपण तिहार जेलमध्ये भेटलो होतो हे आरुषानं मान्य केलेलं नाही.

ईडीने आपल्या चार्जशीटमध्ये या घटनेचा उल्लेख केला आहे,ज्यात सांगितलं आहे की आरुषाच्या बॅंक अकाऊंटमध्ये सुकेशकडून काही रक्कमही जमा करण्यात आली होती.

याच प्रकरणात निकिता तंबोलीनं देखील साक्ष दिली आहे,ज्यात म्हटलं गेलं आहे की पिंकी ईरानी हिनं आरोपी सुकेश चंद्रशेखरची ओळख शेखर या नावाने करुन देत आपली भेट घडवून आणली होती. पिंकीने निकिताला सांगितलं होतं की सुकेश तिचा मित्र आहे आणि दाक्षिणात्य सिनेमांचा निर्माता आहे.

Sukesh chandrashekhar met four female actresses while he was lodged in delhi tihar- ED charge sheet
प्रियंकाचे शॉकिंग खुलासे...

ईडीनं आपल्या चार्जशीटमध्ये म्हटलं आहे की,'निकिता दोनदा सुकेशला भेटली होती. पहिली भेट एप्रिल २०१८ मध्ये झाली होती. आरोपी पिंकी ईरानीला १० लाख रुपयांची मोठी रक्कम मिळाली होती,ज्यातून तिनं १.५ लाख रुपये निकिता तंबोलीला दिले.

तर त्या भेटीनंतर पुढच्या दोन-तीन आठवड्यांतच पुन्हा निकिता-सुकेश भेटले होते. दुसऱ्यांदा निकिता एकटीच सुकेशला भेटायला गेली होती. त्यावेळी निकिताला सुकेशने २ लाख रुपये कॅश आणि महागड्या गुची ब्रॅंडची बॅग गिफ्ट म्हणून दिली होती'.

निकिताची साक्ष १५ डिसेंबर २०२१ रोजी रेकॉर्ड करण्यात आली होती. त्यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांना तिनं हे देखील सांगितलं की,'पिंकीने तिला २०१८ मध्ये व्हॉट्सअप च्या माध्यमातून संपर्क केला होता. आणि स्वतःची ओळख सिनेमाची को-ऑर्डिनेटर आणि निर्माती म्हणून करुन दिली होती'.

ईडीच्या चार्जशीटमध्ये याविषयी काही आणखी वेगळ्या गोष्टी समोर आल्या आहेत. या चार्जशीटमध्ये सांगितलं गेलं आहे की,'पिंकी ईरानीने सांगितलं होतं की तिचा साऊथचा निर्माता असलेल्या एका मित्राला निक्कीला भेटायचे आहे. ही गोष्ट एप्रिल २०१८ मध्ये सांगितली होती. पिंकीने निक्कीला सांगितलं होतं की,शेखरला भेटायला दिल्लीला जात आहोत आणि तिनं दोघींच्या फ्लाइट तिकीट या मुंबईवरुन बूक केल्या होत्या. आणि पुढल्याच दिवशी त्या दिल्लीला रवाना झाल्या'.

Sukesh chandrashekhar met four female actresses while he was lodged in delhi tihar- ED charge sheet
Brahmastra चा धमाका सुरु असतानाच अयान मुखर्जीचा 'ब्रह्मास्त्र 2' विषयी मोठा खुलासा

दिल्लीला आल्यानंतर त्या BMW कारने तिहार जेलला पोहोचल्या. आणि नंतर एक इनोव्हा कार आली,जी त्यांना जेलच्या कॅम्पसच्या आत घेऊन गेली. चार्जशीटमध्ये लिहिलं आहे की, 'कोणतंच सिक्युरिटी चेकिंग झालं नाही,ना त्यांना आयडी विचारला गेला. निकितानं सांगितलं की पिंकीसोबत ती जीने चढून वर गेली,जिथे पिंकीनं सुकेशची शेखर नावानं ओळख करून देत निक्कीची भेट घडवून आणली होती. तो मोठा निर्माता आहे साऊथचा,मोठा माणूस आहे असं सांगितलं होतं.

पहिल्यांदा तर सुकेश म्हणाला की ते त्याचं ऑफिस आहे,पण पुढे तो निकिताला म्हणाला की कोणत्यातरी मोठ्या घोटाळ्यामुळे तो जेलमध्ये आहे पण ऑगस्ट २०१८ पर्यंत त्याला जामीन मिळेल. निकिता याविषयी पुढे म्हणाली होती की,ती फक्त २ वेळा सुकेशला भेटली. दुसऱ्या वेळेस सुकेशनेच २ ते ३ आठवड्यानंतर मुंबईहून दिल्लीला येणारी फ्लाइट तिच्यासाठी बूक केली होती. आणि तिकीट व्हॉट्सअप वर पाठवले होते'.

'बडे अच्छे लगते है' फेम चाहत खन्नाने ईडीला सांगितलं की, तिची सुकेशशी भेट शेखर रेड्डी नावानं करुन दिली होती. तिला पिंकी ईरानीने सांगितलं होतं की शेखर साउथ इंडियन चॅनलचा मालक आहे.

Sukesh chandrashekhar met four female actresses while he was lodged in delhi tihar- ED charge sheet
'खूप लोकांना माहीत नाही की...',पंकज त्रिपाठीचा सिद्धार्थ शुक्लाविषयी मोठा खुलासा

ईडीनं आपल्या चार्जशीटमध्ये म्हटलं आहे की,'मे २०१८ मध्ये चाहत खन्नाने सुकेश चंद्रशेखरची तिहार जेलमध्ये भेट घेतली होती. त्या जागेला सुकेशनं आपल्या ऑफिसचा लूक दिला होता. पिंकी ईरानीने तेव्हा चाहतला २ लाख कॅश दिली आणि निळया रंगाची एक महागडी बॅग दिली.

ईडीने १६ डिसेंबर २०२१ रोजी चाहत खन्नाची साक्ष रेकॉर्ड केली होती,ज्यामध्ये तिनं सांगितलं होतं की,जानेवारी आणि फेब्रुवारी २०१८ मध्ये पिंकीने तिला फोन केला आणि सांगितलं की तिचा मित्र सुकेशच्या फंड रेजिंग इव्हेंटचा भाग बन,पण ते गणित जुळून आलं नाही.

पिंकीने स्वतःचं नाव एंजेल सांगितलं होतं. तिनं सांगितलं होतं की ती एका टॅलेंट एजन्सीची मालकीण आहे,ज्याच्या शाखा लॉस एंजेलिस, दुबई आणि मुंबईत आहेत. तिनं चक्क स्वतः एक वकील असल्याचं देखील चाहतला सांगितलं होतं.

२०१८ मध्ये पिंकीनं चाहतला सुकेशला भेटण्यास सांगितले. त्यानंतर पिंकीने दोघींचे तिकीटही काढले आणि मुंबईहून ती चाहतला घेऊन दिल्लीला रवाना झाली ते तिची सुकेशशी भेट घडवून आणण्यासाठी.

Sukesh chandrashekhar met four female actresses while he was lodged in delhi tihar- ED charge sheet
करण जोहरच्या ब्रेकअपचा गौप्यस्फोट,खुलासा करत म्हणाला,'तेव्हा वरुण धवननेच...'

ईडीनं चार्जशीटमध्ये सांगितले आहे की,'दिल्ली एअरपोर्टवर एक BMW आली आणि त्यांना तिहार जेलला गेट नं ३ जवळ घेऊन गेली. त्यानंतर कार बदलण्यात आली. पिंकीनं चाहतला सांगितलं, सुकेश खूप मोठा माणूस आहे. त्यामुळे जेलमध्ये असूनही त्याला लोकांना भेटण्याची परवानगी आहे.

त्यानंतर इनोवा कारमध्ये बसून जेलच्या कॅंपसमध्ये दोघी गेल्या. एंजेल उर्फ पिंकीनं चाहतला खाली पाहून चालायला सांगितले. म्हणजे तिचा चेहरा सीसीटीव्ही फूटेजमध्ये येणार नाही. कोणतंच चेकिंग झालं नाही ,ना आयडी विचारला गेला. त्यानंतर जेलमधील अधिकारीच चाहत आणि पिंकीला सुकेशकडे घेऊन गेले. त्या रुममध्ये सगळ्या महागड्या वस्तू इतरस्त्र पडल्या होत्या'.

सुकेश चाहतला म्हणाला की, त्याला इलेक्शन व्होटिंग स्कॅममध्ये पकडलं गेलंय. आणि म्हणून तो जेलमध्ये आहे. पुढील ४-५ दिवसांत तो सुटेल. सुकेशनं स्वतःची ओळख शेखर करून दिली. आणि सांगितलं की तो जयललीता यांचा नातेवाईक आहे.

चार्जशीटमध्ये सांगितलं गेलं आहे की चाहतला पिंकी उर्फ एंजेलने सांगितलं आहे की, तिचं खरं नाव आफरीन खान आहे आणि तिनं २ लाख रुपये रोख रक्कम आणि गूची ब्रॅन्डची महागडी बॅग चाहतला गिफ्ट दिली. पिंकीनं काही आर्टिकल देखील चाहतला दाखवले ज्यात लिहिलं होतं की घोटाळ्यामुळे शेखर जेलमध्ये आहे. तिनं सुकेशची ओळख सन टी.व्हीचा मालक अशी करुन दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com