Hijab Row: मी थुंकते अशा... रिचा, स्वराचा हिजाबवरुन कडकडाट

कर्नाटकमध्ये हिजाबचा (Hijab Contraversy) वाद पेटला आहे.
Swara Bhaskar Richa chadha
Swara Bhaskar Richa chadha

Karnataka Hijab Row- कर्नाटकमध्ये हिजाबचा (Hijab Contraversy) वाद पेटला आहे. त्यावरुन गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. सोशल मीडियावरील (Social Media News) पोस्टनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. सध्या हाती आलेल्या माहितीनुसार कर्नाटकमधील वातावरण संवेदनशील असून पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. बॉलीवूडच्या सेलिब्रेटींनी हिजाब प्रकरणावरुन आपली नाराजी व्यक्त केली आहे. अभिनेत्री कंगना, स्वरा भास्कर (Swara Bhaskar) आणि रिचा चढ्ढा (Richa Chadha) यांनी सडकून टीका केली आहे.

आतापर्यत गीतकार जावेद अख्तर, अभिनेत्री हेमा मालिनी, प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता कमल हसन, किम शर्मा, नीरज घायवान यांनी हिजाब प्रकरणावरुन कर्नाटक सरकारला धारेवर धरल्याचे दिसून आले आहे. कुणी काय परिधान करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आपल्या संविधानामध्ये धर्माचे, निवडीचे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे हिजाब प्रकरणावरुन नवे वाद समोर आले आहेत. आता स्वरा आणि रिचा यांनी हिजाब प्रकरणाला लज्जास्पद असे म्हटले आहे.

Swara Bhaskar Richa chadha
Viral Video : महिलांची अंधश्रद्धा; चारचौघात खाताहेत चाबकाचे फटके

रिचानं ट्विटमध्ये हिजाब परिधान करणाऱ्या विद्यार्थीनीचा व्हिडिओ देखील शेयर केला आहे. त्यामध्ये काही विद्यार्थी त्या विद्यार्थीनीला घातला. यावेळी त्या विद्यार्थ्यांनी जय श्रीरामचा नारा देत वेगळे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान अनेकांनी या घटनेची दखल घेतली आहे. त्यावरुन प्रतिक्रियाही दिली आहे. अभिनेत्री रिचानं लिहिलं आहे की, भित्र्या लोकांचा एक झुंड एकट्या मुलीला धमकावण्यासाठी जात असल्याचे दिसुन आले आहे. यावरुन आपण काय शिकायचं, राज्यकर्त्यांना यातून काय साध्य करायचे आहे असा प्रश्न रिचानं विचारला आहे. स्वरानं त्या विद्यार्थ्यांना भित्रे असं म्हटलं आहे.

Swara Bhaskar Richa chadha
Pushpaच्या 'उ अंतवा' गाण्यावर नवरा-नवरीचा जबरदस्त डान्स Viral!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com