'अक्षय जे सिनेमे करतो...', आता खिलाडी कुमारही खटकला स्वराला, पहा काय म्हणाली? Swara Bhaskar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Swara Bhasker says she doesn’t agree with Akshay Kumar

'अक्षय जे सिनेमे करतो...', आता खिलाडी कुमारही खटकला स्वराला, पहा काय म्हणाली?

Swara Bhaskar: स्वरा भास्करचा 'जहां चार यार' सिनेमाघरात लवकरच रिलीज होणार आहे. स्वरा सध्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. आपल्या बेताल वक्तव्यांमुळे तीदेखील अनेकदा कंगना रनौतसारखी चर्चेत राहिलेली पहायला मिळते. आता पुन्हा स्वराने बॉलीवूडवर निशाणा साधत म्हटलं आहे की,आपण लोकशाही असलेल्या देशात राहतो त्यामुळे इथे प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. लोक एखाद्या गोष्टीशी सहमत असू शकतात किंवा नसू देखील शकतात. आणि हिच लोकांची खासियत मला आवडते. स्वराने यावेळी अक्षय कुमारचा उल्लेख करत म्हटलं आहे की तो ज्या प्रकारच्या सिनेमांचे समर्थन करतो त्याच्याशी मी सहमत नाही, मला अनेकदा त्याचे सिनेमे पटत नाहीत.(Swara Bhasker says she doesn’t agree with Akshay Kumar)

हेही वाचा: 'माझ्या निधनानंतर माझं कुटुंब खूश होईल कारण...'; महेश भट्ट हे काय बोलून गेलेले?

अक्षय कुमारचा सिनेमा 'कठपुतली' काही दिवसांपूर्वीच डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला आहे. यावर्षी अक्षयचा 'बच्चन पांडे','सम्राट पृथ्वीराज','रक्षाबंधन' असे तीन सिनेमे थिएटरमध्ये प्रदर्शित झाले. आणि हे तिन्ही सिनेमे फ्लॉप ठरले. सोशल मीडयावर अक्षयच्या सिनेमांना घेऊन बॉयकॉट ट्रेन्ड सुरु झालेलाही पहायला मिळाला.

हेही वाचा: 'खल्लास गर्ल' सध्या काय करते?

'बॉलीवूड सेलिब्रिटी सॉफ्ट टार्गेट असतात का?' यावर स्वरानं एका मुलाखतीत म्हटलं आहे की,''आमचं काम लोकांना कथा ऐकवायचं,दाखवायचं आणि ते आम्हाला ईमानदारीनेच केलं पाहिजे. मला वाटतं आपण जर असे वागलो तर उगाचच कोण का आपल्याला टार्गेट करेल. स्वतःला कुठल्याही वादग्रस्त मुद्द्याचा भाग बनू द्यायचं नाही यासाठी आपण प्रयत्नशील रहायला हवं. बॉलीवूडमध्ये अनेकजण वेगवेगळया पद्धतीनं बोलतात,व्यक्त होतात आणि हीच बॉलीवूडची खासियत आहे. मी अक्षय कुमार ज्या पद्धतीच्या सिनेमांचे समर्थन करतात,जसे सिनेमे करतात त्याच्याशी सहमत नाही. पण म्हणून त्यांचे सिनेमे फ्लॉप व्हावेत किंवा त्यांनी ते रिलीज करू नयेत असा याचा मुळीच अर्थ नाही''.

हेही वाचा: 'नॅशनल क्रश' म्हटल्यावर रश्मिका पहा काय म्हणाली...

स्वरा पुढे म्हणाली की,''लोकशाहीत लोकांना राजकीय विचारही व्यक्त करता आले पाहिजेत. सुरुवातीला सगळ्यांना माझ्याबाबतीत वाटायचं मी अडचणी निर्माण करते. आपण जे ग्रुपिझम करतोय त्यानं कुणाचेच भले होणार नाही. गोष्ट फक्त एवढीच आहे की मी रांगेत दुसऱ्यांच्या बरोबर पुढे आहे. मला कुणी रोकू शकत नाही. ना नेपोटिझम, ना ग्रुपिझम''.

Web Title: Swara Bhasker Says She Doesnt Agree With Akshay

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..