'Taarak Mehta..'च्या निर्मात्यांविरोधात आता मैदानात उतरली मोनिका भदोरिया, म्हणाली,'सेटवर कुत्र्यासारखं..'

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत 'बावरी' ही भूमिका साकारणाऱ्या मोनिका भदोरियानं २०१९ मध्ये वादामुळे मालिकेला रामराम ठोकला होता.
Taarak Mehta Controversy
Taarak Mehta ControversyEsakal

Taarak Mehta Controversy: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत 'बावरी' ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री मोनिका भदोरियानं आता शो चे निर्माते आणि कार्यकारी निर्मात्यांविरोधात आवाज उठवला आहे.

मोनिका भदोरियानं हिंदुस्थान टाइम्सला एक मुलाखत दिली आहे. ज्यामध्ये तिनं सेटवरील एकंदरीत परिस्थितीविषयी चर्चा केली. ती म्हणाली की, तिनं हा शो २०१९ मध्येच सोडला होता आणि निर्मात्यांनी तिचं ३ महिन्यांचं मानधन चक्क १ वर्षापर्यंच थकवलं,जे साधारण ४ ते ५ लाखांच्या दरम्यान होतं.

मोनिका भदोरियानं सेटवरच्या दिवसांची आठवण काढत त्याची तुलना नरकाशी केली आहे. तिनं हे देखील सांगितलं की जेव्हा तिच्या कॅन्सरग्रस्त आईवर उपचार सुरू होते,तेव्हा देखील शो च्या निर्मात्यांनी तिला सहाय्य केलं नाही.

ती म्हणाली,''मी पूर्ण रात्र हॉस्पिटलमध्ये थांबायचे आणि ते सकाळी मला लवकर सेटवर बोलवायचे,मी त्यावेळी चांगल्या मनःस्थितीत नव्हते. पण ते तरिही बोलवायचे. बरं शूटवर आल्यावर देखील मला खूप वाट पहायला लागायची.माझं काही काम नसायचं लवकर तरी बोलवायचे मला''. (Taarak Mehta Controversy Actress Monika Bhadoriya accuses asit modi)

Taarak Mehta Controversy
Milind Gawali: मिलिंद सोमणनंतर आता मिलिंद गवळी जोमात.. म्हातारपणात तरुण दिसण्यासाठी म्हणाले..
Taarak Mehta Controversy
Viral Video: राखीला प्रश्न विचारताना करण जोहरनं ओलांडलेली मर्यादा.. म्हणाला होता,'तुझ्या शरीरावर कुठे कुठे ..'

जेव्हा मोनिका भदोरियाच्या आईचं निधन झालं तेव्हा शो चे निर्माते असित मोदी यांनी तिला सांत्वनाखातर एक फोनही केला नाही. त्यावर मोनिका म्हणाली,''मी मानसिक तणावात होते पण त्यांनी माझ्या आईच्या निधनानंतर सातव्या दिवशी मला कॉल केला आणि म्हटलं की मला सेटवर लवकर परतावं लागले''.

'' जेव्हा मी माझी मानसिक स्थिती ठीक नाही असं सांगितलं तेव्हा त्यांच्या टीमनं मला सांगितलं, आम्ही तुम्हाला पैसे देत आहोत,तेव्हा आम्ही बोलवू तेव्हा तुम्हाला यावं लागेल. मग भले तुमची आई हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असो की आणखी कुणी. मी सेटवर तेव्हा गेले कारण माझ्याकडे काहीच ऑप्शन नव्हता''.

यासंदर्भात पुढे बोलताना मोनिका भदोरिया म्हणाली,''मी त्यांना बोलले,मला अशा ठिकाणी कामच करायचे नाही जिथे तुम्हाला काम करुनही वाटेल की तुम्ही बेरोजगार आहात. जो कोणी येतो तो आगाऊपणे बोलतो''.

''सोहेल रमानी हा तर सगळ्यात उद्धट बोलणारा माणूस आहे''.

मोनिका भदोरिया पुढे म्हणाली की, ''जेव्हा तिनं शो सुरु केला होता तेव्हा तिला ३० हजार रुपये महिन्याला द्यायचे. त्यांनी वचन दिलं होतं की ६ महिन्यानंतर तिचे पैसे वाढवतील. पण त्यांनी असं केलं नाही''.

Taarak Mehta Controversy
Neetu Kapoor यांनी मुंबईत खरेदी केलं आलिशान घर.. किंमत ऐकून बसेल ४४० व्हॉल्टचा झटका..
Taarak Mehta Controversy
Cannes Film Festival: राणीच्या बागेपेक्षा महाग उर्वशीच्या गळ्यातल्या मगरी.. नेकलेसची किंमत ऐकाल तर..

मोनिका पुढे म्हणाली, ''ते पैशाच्या बाबतीत नेहमीच फसवेगिरी करायचे. खरं सांगायचं तर ते कलाकारांना कुत्र्यासारखं वागवायचे. माझ्यासोबत तर ते खूप चूकीचं वागलेयत आणि त्यांचा कार्यकारी निर्माता सोहेल रमानी सगळ्यात वाईट माणूस आहे''.

''तो खूपच आगाऊ आहे. त्यानं तर वयस्कर नट्टू काकांना देखील अपमानित केलं आहे..''

जेव्हा यासंदर्भात सोहेल रमानी आणि असित मोदी यांना विचारलं गेलं तेव्हा त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com