''तारक मेहता का..''ने केला छोट्या पडद्यावर विक्रम; काय तो वाचा...

संतोष भिंगार्डे
Wednesday, 29 July 2020

आता तेराव्या वर्षात या मालिकेने पदार्पण केले आहे. आतापर्यंत दोन हजार 950 एपिसोड्स प्रसारित झाले आहेत. जेठालालची भूमिका साकारणारा अभिनेता दिलीप जोशी म्हणतो, की देवाची आमच्यावर कृपा आहे. त्याच्याच आशीर्वादाने वाटचाल सुरू आहे.

मुंबई ः नीला फिल्म प्रॉडक्शनची 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या सोनी सब टीव्हीवरील मालिकेने असंख्य प्रेक्षकांचे मनसोक्त मनोरंजन केले. सध्याची सर्वात लोकप्रिय मालिका म्हणून या मालिकेकडे पाहिले जाते. केवळ मनोरंजन हा हेतू न ठेवता सामाजिक प्रबोधनाचे कामही या मालिकेने केले. 

वातावरण बदलासोबतच मुंबईकरांची चिंता वाढली; सर्दी, तापाचे रुग्णांच्या संख्येत वाढ....

निर्माते असित मोदी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने अथक मेहनत घेतली आणि या मालिकेचा टीआरपी सतत वाढताच राहिला. या मालिकेतील बहुतेक व्यक्तिरेखांना चांगलीच लोकप्रियता मिळाली. 28 जुलै 2008 मध्ये या मालिकेचा पहिला भाग प्रसारत झाला आणि आता या मालिकेला तब्बल बारा वर्षे पूर्ण झाली आहेत. 

श्रावण महिन्यात बटाटा महागला; लसणाचे भावही चढेच, कांदा मात्र स्थिर....

आता तेराव्या वर्षात या मालिकेने पदार्पण केले आहे. आतापर्यंत दोन हजार 950 एपिसोड्स प्रसारित झाले आहेत. जेठालालची भूमिका साकारणारा अभिनेता दिलीप जोशी म्हणतो, की देवाची आमच्यावर कृपा आहे. त्याच्याच आशीर्वादाने वाटचाल सुरू आहे.

सोसायटीत चक्कर मारताना कशाला हवा मास्क ? आधी ही बातमी वाचा, नाहीतर बसेल मोठा आर्थिक फटका...

निर्माते असित मोदी म्हणाले, की आमच्या संपूर्ण टीमची ही मेहनत आहे. त्यांच्यामुळेच मालिकेने एवढा मोठा पल्ला गाठला आहे. आम्ही केवळ मनोरंजन हा हेतू न ठेवता प्रेक्षकांना काही सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला. विविध विषय हाताळले. आमच्या लेखकांनी चांगले लिखाण केले. प्रेक्षकांनी आमच्यावर खूप प्रेम केले आणि त्यांचे हे प्रेम असेच राहील अशी आशा करतो. अजूनही आम्हाला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे.  
---
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tarak mehta ka... sets new record for 12 years of telecasting..