'The Archies' चित्रपटाच्या चर्चेला उधाण..या बॉलीवूड किड्सचा असणार हा चित्रपट

Bollywood: नुकत्याच रीमा कागतीने टाकलेल्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे 'द आर्चीज' या चित्रपटाच्या चर्चेला परत एकदा उधाण आले आहे.
'The Archies" Debut Film of Suhana Khan,Agastya Nanda and Khushi Kapoor coming soon
'The Archies" Debut Film of Suhana Khan,Agastya Nanda and Khushi Kapoor coming soonesakal

सुहाना खान, खुशी कपूर आणि अगस्त्या नंदा यांच्या चित्रपटाची चर्चा मागील वर्षापासून सुरू होती.(suhana khan)या चर्चेला बराच काळ लोटला असून अजून परत एकदा सुहाना,खुशी,अगस्त्या या बॉलीवूड किड्सची एन्ट्री चित्रपटात होणार असल्याचे कळते(agastya nanda)आहे.सुहाना, खुशी आणि अगस्त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत असतानाच, नुकत्याच रिमा कागतीने टाकलेल्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे 'द आर्चीज' या चित्रपटाच्या चर्चेला परत एकदा उधाण आले आहे.

निर्माती रीमा कागतीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.झोया अख्तरच्या आगामी दिग्दर्शनातील 'द आर्चीज' मधून सुहाना, खुशी आणि अगस्त्य या बॉलीवूडमधे पदार्पण करणार आहेत जे लोकप्रिय कॉमिक मालिकेवर आधारित आहे.झोयाने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये या प्रोजेक्टची घोषणा केली होती, मात्र, तिने अद्याप या चित्रपटातील कलाकारांबाबत घोषणा केलेली नव्हती.मात्र रीमाने नुकत्याच टाकलेल्या इन्टाग्राम पोस्टमुळे या चित्रपटाची चर्चा सगळीकडे सुरू झालेली दिसते.तीने तीच्या इन्टाग्रामला 'द आर्चीज'असे लिहत क्लॅप बोर्डचा फोटो टाकत येणाऱ्या चित्रपटाची माहिती दिली आहे. तसेच चित्रपटाचे चित्रीकरण उटी आणि आसपासच्या हिल स्टेशनमध्ये केले जात असल्याचे कळते आहे.

'The Archies" Debut Film of Suhana Khan,Agastya Nanda and Khushi Kapoor coming soon
Photos : 'हाय रे मेरा घागरा'! Janhvi Kapoor चा ग्लॅमरस लूक

फरहान अख्तरने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट रिशेअर केली आणि टीमला शुभेच्छा दिल्या.चित्रपटात अगस्त्य 'अँड्र्यूजच्या' भूमिकेत दिसणार आहे, तर खुशी आणि सुहाना 'बेट्टी आणि वेरोनिकाच्या' भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे.सुहाना खान ही प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानची मुलगी आहे.तर खुशी कपूर ही अभिनेत्री जान्हवी कपूरची बहिण आहे.(khushi kapoor)आणि अगस्त्य हा अमिताभ बच्चनचा नातू आणि श्वेता बच्चनचा मुलगा आहे.त्यामुळे चाहते या तिघांचा येणारा चित्रपट पाहाण्यास उत्सुक आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com