सुमोना चक्रवर्तीचा 'कपिल शो'ला रामराम?, चाहत्यांना मोठा धक्का

टीव्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये सर्वात लोकप्रिय असणारा कार्यक्रम म्हणजे कपिल शर्मा शो.
The kapil sharma show News, Sumouna Chakravarti latest news, Sumouna Chakravarti quit The kapil sharma show
The kapil sharma show News, Sumouna Chakravarti latest news, Sumouna Chakravarti quit The kapil sharma showesakal

Tv Entertainment: टीव्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये सर्वात लोकप्रिय असणारा कार्यक्रम म्हणजे कपिल शर्मा शो. या शो चा चाहतावर्ग मोठा आहे. सोशल मीडियावर देखील (Social media News) त्याची लोकप्रियता मोठी आहे. गेल्या काही दिवसांपासून हा कार्यक्रम आणि त्याचा निवेदक कपिल शर्मा हा चर्चेत आला आहे. त्याचे कारण (Kapil Sharma Show) त्यानं द काश्मीर फाईल्स या चित्रपटाच्या प्रमोशनला नकार दिला होता. त्यानंतर त्याच्यावर नेटकऱ्यांनी सडकून टीकाही केली होती. आता कपिल शर्मा शो मधील एक प्रसिद्ध कलाकार हा शो सोडणार असल्याची चर्चा (The Kashmir Files Movie) व्हायरल झाली आहे. त्या महिला कलाकारानं आठ वर्षांपासून कपिल शो मधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्या कलाकाराच्या जाण्यानं नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. (Sumouna Chakravarti latest news)

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कपिल शर्मा शो मधील भुरी अर्थात सुमोना चक्रवर्ती (Sumouna Chakravarti) या कार्यक्रमातून ब्रेक घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तिनं आता दुसऱ्या एका मनोरंजन वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रमामध्ये निवेदकाची भूमिका स्विकारली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आणि त्या अभिनेत्रीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सुमोनानं ज्या कार्यक्रमामध्ये भाग घेतला आहे तो एक ट्रॅव्हल शो आहे. त्याचे 10 एपिसोड शुट होणार असून त्यातून आपण पश्चिम बंगाल एका वेगळ्या प्रकारे प्रेक्षकांसमोर येणार आहे. एका दैनिकाशी बातचीत करताना तिनं सांगितलं की, मला आता एक वेगळी संधी मिळते आहे. त्याचा लाभ घेण्याचे मी ठरवले. आपल्या देशातील वेगवेगळी राज्ये आणि त्यांचं सौंदर्य हे आता नव्यानं पाहता येणार आहे याचा आनंद आहे. त्यामुळे मी हा शो करण्याचे ठरवले आहे. मला त्या शो चे निर्माते यांनी त्यांची कल्पना समजावून सांगितली. आणि मला ती आवडली. त्यामुळे मी त्याचा भाग झाले आहेत.

The kapil sharma show News, Sumouna Chakravarti latest news, Sumouna Chakravarti quit The kapil sharma show
Viral Song : 'चंद्रमुखी'च्या दिलखेचक अदा: अमृतावर कौतुकाचा वर्षाव

मला नेहमीच प्रवास करणे आणि त्याचा भाग होणे आवडते. आता नव्यानं एक वेगळी संधी आली असताना मी त्याचा स्विकार करणे योग्य आहे. असे मला वाटते. त्यामुळे मी त्याची निवड केली आहे. दुसरीकडे कपिल शर्मा शो मधून मात्र भुरी बाहेर पडण्यावरुन कोणत्याही पद्धतीचे अधिकृत स्टेटमेंट बाहेर आलेले नाही. सोशल मीडियावर सुमोनाच्या नावाची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरुवात झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com