The Kashmir Files: अखेर ओटीटी वर 'या' तारखेला होणार प्रदर्शित OTT Platform | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

The Kashmir Files OTT Release date

The Kashmir Files: अखेर ओटीटी वर 'या' तारखेला होणार प्रदर्शित

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द काश्मिर फाईल्स'(The Kashmir FIles) हा सिनेमा ज्यांचा पहायचा राहिला असेल त्यांना आता घरी बसून पाहता येणार आहे. काश्मिरी हिंदूवरचा अत्याचार आणि पलायनवादावर आधारित या सिनेमाचं कथानक आहे. Zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासू फक्त याची चर्चा सुरु होती,आता प्रदर्शनाची तारीख जाहिर झाली आहे.

विवेक अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत सिनेमा ओटीटीवर कधी प्रदर्शित होणार आहे याची तारिख सांगितली आहे. 'द काश्मिर फाईल्स' १३ मे ला ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आता ज्यांचा थिएटरात जाऊन सिनेमा पहायचा राहून गेला आहे,त्यांच्यासाठी सिनेमा घरी बसून पहायची ही सुवर्णसंधी आहे.

हेही वाचा: सारा तेंडुलकर बॉलीवूड एन्ट्रीविषयी मोठा खुलासा; कुटुंबातील सदस्याची माहिती

या सिनेमात १९९० साली काश्मिरी पंडितांवर दहशतवाद्यांनी केलेल्या अत्याचाराची मन हेलावून टाकणारी कहाणी मांडण्यात आली आहे. या सिनेमानं संपू्र्ण देशाला हलवून सोडलं होतं. ज्या पद्धतीनं सिनेमाच्या शेवटी काश्मिरी महिलांवर अत्याचार दाखवला गेला आहे ते पाहून प्रत्येक प्रेक्षक ढसाढसा रडताना अनेकांनी पाहिलं असेल. प्रदर्शना आधीपासूनच सिनेमाविषयी रंगलेले वाद प्रदर्शनानंतरही सुरू होते पण याचा सिनेमाच्या बॉक्सऑफिस कलेक्शनवर काहीच परिणाम झाला नाही.

हेही वाचा: अक्षयचा नवा सिनेमा; विमान कंपनीच्या मालकाची भूमिका साकारणार...

भारतातच नाही तर परदेशातही या सिनेमाची खूप प्रशंसा झाली. ११ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित झालेला हा सिनेमा ब्लॉकबस्टर यादीत सामिल झाला आहे. सिनेमाला मिळणारा प्रतिसाद पाहता जवळजवळ २५ देशात ३५० स्क्रीनवर हा सिनेमा प्रदर्शित केला गेला. या सिनेमात अनुपम खेर(Anupam Kher),दर्शन कुमार,पल्लवी जोशी,मिथुन चक्रवर्ती,चिन्मय मांडलेकर,पुनीत इस्सर अशा कलाकारांनी उत्तम अभिनयांन सिनेमाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे.

Web Title: The Kashmir Files Ott Release Date

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top