मराठी बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वाची चर्चा; प्रेक्षकांच्या भेटीला मात्र पुढील वर्षीच...

संतोष भिंगार्डे 
गुरुवार, 30 जुलै 2020

कलर्स मराठीवर बिग बॉसचे पहिले आणि दुसरे सीझन कमालीचे लोकप्रिय ठरले होते. महेश मांजरेकर यांनी आपल्या खुमासदार सूत्रसंचालनाने आणि स्पर्धकांच्या विविध टास्कमुळे हा कार्यक्रम चांगलाच गाजला होता.

मुंबई : सध्या अनलॉकचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे आणि काही टीव्ही मालिकांचे चित्रीकरण हळूहळू सुरू झाले आहे. हिंदीमधील बिग बॉस येणार असे म्हटले जात असले, तरी मराठीतील बिग बॉसचा तिसऱ्या सीझनची चर्चा सुरु झाली आहे. मात्र, ती पुढील वर्षी येण्याची आता शक्यता आहे. कारण सध्या मालिकांचे शूटिंग जरी सुरू असले तरी नॉन-फिक्शन कार्यक्रमाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मुंबईकर महिलांची प्रतिकार शक्ती पुरुषांपेक्षा जास्त, सिरो सर्व्हेचा निष्कर्ष...

कलर्स मराठीवर बिग बॉसचे पहिले आणि दुसरे सीझन कमालीचे लोकप्रिय ठरले होते. महेश मांजरेकर यांनी आपल्या खुमासदार सूत्रसंचालनाने आणि स्पर्धकांच्या विविध टास्कमुळे हा कार्यक्रम चांगलाच गाजला होता. मराठी प्रेक्षकांनीच नाही तर अमराठी प्रेक्षकांनीही कुतूहल म्हणून हा कार्यक्रम पाहिला होता. मेघा धाडे पहिल्या सीझनची विजेती ठरली होती, तर शिव ठाकरने दुसऱ्या सीझनचे विजेतेपद पटकाविले होते. पहिल्या सीझनचे चित्रीकरण लोणावळा येथे झाले होते तर दुसऱ्या सीझनचे चित्रीकरण गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत झाले होते. 

लॉकडाऊनमधून नव्हे, तर 'यामध्ये' सूट द्या; पुरुषांनी केली न्यायालयाकडे मागणी...

त्यानंतर आता तिसरे सीझन येणार होते. मात्र ते येण्याची शक्यता खूप कमी आहे. कारण चित्रीकरणाला सरकारने काही अटी आणि नियम घालून परवानगी दिली आहे. त्यानुसार बिग बॉसचे चित्रीकरण करणे कठीण बाब आहे. परिस्थिती निवळली तर काही विचार करण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. हिंदीचे चौदावे सीझन येणार आहे. सलमान खान पनवेल येथील आपल्या फार्म हाऊसवरूनच चित्रीकरणात भाग घेणार आहे. परंतु तरीही ते सीझन लवकर येईल, असे वाटत नाही. त्यामुळे मराठी बिग बॉसचे तिसरे सीझन आता पुढील वर्षीच येईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
---
संपादन ः ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: third season of marathi big boss will come in next year...