शाहरुखचं 'मन्नत' उडवून देणार होता: पोलिसांनी केली अटक | threat call from jabalpur bollywood king khan Shahrukh | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bollywood King Khan Shahrukh Khan
शाहरुखचं 'मन्नत' उडवून देणार होता: पोलिसांनी केली अटक

शाहरुखचं 'मन्नत' उडवून देणार होता: पोलिसांनी केली अटक

बॉलीवूडच्या किंग खानला शाहरुखच्या (Bollywood King Khan Shahrukh Khan) जीवाला धोका असल्याची बातमी सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाली आहे. एका अज्ञातानं शाहरुखचा बंगला उडवून देण्याची धमकी दिली होती. धमकी देणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी मध्यप्रदेश पोलिसांनी जबलपूरमधून ताब्यात घेतलं आहे. त्याचं नाव जितेंद्र ठाकूर असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांपासून या तरुणानं सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेयर करुन शाहरुखविषयी उलट सुलट प्रतिक्रिया दिल्या होत्या. पोलिसांनी त्याला आता अटक केली आहे. Shahrukh Khan Mannat house blast threat call

आपल्या अभिनयामुळे केवळ भारतच नाहीतर जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये शाहरुखचे (Bollywood Actor Shahrukh Khan) चाहते आहेत. त्याच्यावर जसे प्रेम करणारे आहेत त्याचप्रमाणे त्याला धमक्या देणारेही आहेत. गेल्या काही महिन्यांपासून शाहरुख चर्चेत आला आहे. तो त्याच्या चित्रपटामुळे नव्हे तर त्याचा मुलगा आर्यन खान याच्यामुळे. त्याच्यावर ड्रग्ज घेतल्याचा आरोप एनसीबीनं केला होता. त्याची जामीनावर सुटका झाली आहे. त्यामुळे शाहरुखला दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा: VIDEO : फिल्डर्संनी बॉलरलाच बाउंड्री अडवायला पळवलं!

मध्यप्रदेशातील त्या तरुणानं फेक कॉल करुन सगळ्यांना घाबरुन ठेवले होते. त्यामुळे पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव त्याला अटक केल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानं केवळ शाहरुखच्या बंगल्यामध्येच नाही तर मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्ब ठेवण्याची धमकी दिली होती. माध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्या आरोपीनं सुरुवातीला कंट्रोल रुमला फोन करुन आपण काय करणार आहोत याची माहिती दिली होती. त्यावेळी त्यानं आपल्याला शाहरुखचं मन्नत बॉम्बनं उडवून द्यायचं असल्याचं त्यानं सांगितलं होतं. जितेश ठाकुर हा जबलपूरमधील संजीवनी नगरमध्ये राहणारा आहे.

हेही वाचा: Video : समुद्रात बुडणाऱ्या पर्यटक महिलेचे मुंबई पोलिसांनी वाचवले प्राण!

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top