Timepass 3- हृताचं चाहत्यांना थंडगार कोल्ड्रिंक चॅलेंज,काय आहे बरं ते...

Timepass 3 सिनेमा येत्या २९ जुलै रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे.
Timepass 3: Hruta Durgule's Cold drink Challenge viral
Timepass 3: Hruta Durgule's Cold drink Challenge viralInstagram

(Timepass 3)'टाइमपास' म्हटलं की डोळ्यासमोर येते ती दगडू आणि प्राजूची जोडी आणि त्यांची आगळी वेगळी लव्हस्टोरी. पहिल्या भागात प्रेक्षकांच्या मनाला हुरहूर लावून अधुरी राहिलेली प्रेमकथा दुसऱ्या भागात प्रेक्षकांना आनंद देत पूर्ण झाली. पहिल्या भागात बालपणात एकमेकांपासून दुरावलेले दगडू आणि प्राजू दुसऱ्या भागात तरुणपणात एकमेकांना भेटले आणि एकही झाले. याच बालपण आणि तरुणपणाच्या मधल्या टप्प्यात दगडूचं नेमकं काय झालं ? प्राजू त्याच्यापासून दूर गेल्यानंतर त्याच्या आयुष्यात काय काय बदल झाले? हे सांगणारी गोष्ट आता टाइमपास ३ मधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.(Timepass 3: Hruta Durgule's Cold drink Challenge viral)

झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशनची निर्मिती असलेल्या आणि रवी जाधव यांच्या दिग्दर्शनाने सजलेल्या या चित्रपटाच्या टिझरने आणि गाण्यांनी प्रेक्षकांमध्ये यापूर्वीच उत्सुकता निर्माण केली आहे. टाइमपासच्या दोन्ही भागात प्रेक्षकांना दगडू आणि प्राजूची प्रेमकथा बघायला मिळाली होती. याही भागात प्रेमकथा असणार आहेच पण यावेळी दगडूसोबत असणार आहे पालवी. आणि ही पालवी साकारली आहे सध्याच्या तरुणाईच्या 'दिल की धडकन' अशी ओळख असणाऱ्या हृता दुर्गुळे(Hruta Durgule) हिने. विशेष म्हणजे आजवर कधीच न बघितलेल्या अवतारात हृता आपल्याला यात दिसणार आहे. तिचा हाच डॅशिंग अवतार टिझर मधून प्रेक्षकांनी बघितला होताच आता ट्रेलरमधून डॅशिंग सोबत तिची 'लव्हेबल' अदाही बघायला मिळणार आहे.

Timepass 3: Hruta Durgule's Cold drink Challenge viral
Koffee With karan 7 शो ची कार्तिकने उडवली खिल्ली, म्हणाला, 'मला अभिमान....'

चित्रपटात दगडूच्या भूमिकेतील प्रथमेश परब आणि पालवी हृता दुर्गुळेसोबतच, माधव लेले उर्फ शाकाल म्हणजेच वैभव मांगले, शांताराम परब म्हणजे भाऊ कदम, आरती वडगबाळकर, दगडू गॅंग आणि एका जबरदस्त भूमिकेत संजय नार्वेकर बघायला मिळणार आहेत. चित्रपटात एकूण पाच गाणी असून ती क्षितीज पटवर्धन यांनी लिहिली आहेत तर संगीत अमितराज यांचं आहे. चित्रपटाची कथा रवी जाधव यांची असून त्यांच्यासोबतीने प्रियदर्शन जाधव याने चित्रपटाची पटकथा आणि सवांद लिहिले आहेत.

Timepass 3: Hruta Durgule's Cold drink Challenge viral
Bollywood च्या ढासळत्या कामगिरीवर फरहान अख्तर स्पष्टच बोलला, म्हणाला...

चित्रपटाच्या ट्रेलरने केवळ तरुणाईचं नाही तर सर्वच वयोगटातील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. शिवाय साई तुझं लेकरू आणि लव्हेबल या गाण्यांनाही प्रेक्षकांनी आपल्या पसंतीची पावती दिली आहे. यामुळे टाइमपास ३ बद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. ही उत्सुकता अधिक वाढविण्यासाठी आणखी एक गाणं ‘कोल्ड ड्रिंक वाटतेस’ हे आपल्या तालावर ठेका धरायला लावतंय. प्रथमेश परब आणि हृता दुर्गुळे यांच्यावर चित्रित झालेलं हे धम्माल गाणं गायलं आहे अमितराज आणि हिंदीमध्ये आपल्या आवाजाची जादू पसरवणाऱ्या शाल्मली खोलगडे यांनी.

Timepass 3: Hruta Durgule's Cold drink Challenge viral
Video Viral: 'भीतीवर कसं ठेवणार नियंत्रण?' हृतिक रोशन काय म्हणतोय पहा...

आता सिनेमा २९ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे,त्यानिमित्ताने हताने या कोल्ड्रिंक गाण्याचं आपल्या चाहत्यांना चॅलेंज दिलं आहे. तिने सिनेमातील गाण्याचा व्हिडीओ पोस्ट करत म्हटलं आहे की, ''बेधडक पालवी आपल्या दगडूला गार-गार कोल्डड्रिंक वाटतेय, काय कारण असेल बरं?''

तुम्हीसुद्धा #ColdDrinkChallenge घ्या, Reel तयार करा आणि अपलोड करताना आम्हाला tag करा.

येतोय #Timepass3 29 जुलैपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात....

आता हृताच्या या चॅलेंजनंतर सोशल मीडियावर कोल्ड्रिंक गाण्याच्या रीलचा पाऊस पडतोय का, चाहत्यांचा प्रतिसाद कसा मिळतोय, गाण्यातील स्टेप्सऐवजी चाहत्यांच्या भन्नाट स्टेप्स आपलं कसं मनोरंजन करतायत याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलं असणार हे मात्र नक्की.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com