Timepass 3 : अशी आहे दगडूची नवी लव्हस्टोरी, जाणून घ्या कास्ट, रिलीज डेट..

बहुचर्चित 'टाइमपास 3' विषयी जाणून घ्या सर्व काही, एकाच बातमीत..
timepass 3 release date cast ravi jadhav hruta durgule prathamesh parab marathi movie music
timepass 3 release date cast ravi jadhav hruta durgule prathamesh parab marathi movie musicsakal

Timepass 3 Marathi Movie Release Date

'बालक-पालक', 'टाइमपास' असे प्रत्येकाच्या आयुष्यातले विषय घेऊन त्याला हास्य, विनोद, प्रेम आणि उत्तम आशयाची जोड देणारा दिग्दर्शक म्हणजे रवी जाधव. त्यांनी जया ताकदीने गंभीर विषय हाताळले तितक्याच गामितीशीर मांडणीतून ते तरुणांना भावतील असे चित्रपट साकारतात. सध्या चर्चा आहे ती त्यांच्या 'टाइमपास 3' या चित्रपटाची. दगडूच्या आयुष्यातील पहिलं प्रेम आणि लग्नापर्यंतचा प्रवास त्यांनी दोन भागांमध्ये दाखवला, आता दरम्यानच्या काळात जेव्हा दगडूला प्राजक्ता जोडून गेली तेव्हा नेमकं काय झालं, याची भन्नाट स्टोरी म्हणजे हा 'टाइमपास 3' आहे.

timepass 3 release date cast ravi jadhav hruta durgule prathamesh parab marathi movie music
आयटम केम, लाईफचा गेम.. टाइमपास ३ चा धमाल ट्रेलर पाहाच..

टाइमपास' या चित्रपटाला प्रेक्षकांचा इतका प्रतिसाद मिळाला की काही कालावधीतच या चित्रपटाचा दुसरा भागही प्रदर्शित झाला. या दोन्ही भागांच्या दमदार यशानंतर आता तिसरा भाग म्हणजेच 'टाइमपास ३' ;लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मराठीत एखाद्या चित्रपटाचा तिसरा भाग येणे हा एकप्रकारचा प्रयोगच आहे. शिवाय या भगत दगडू आणि प्राजक्ता नाही तर दगडू आणि पालवीची लव्हस्टोरी पाहायला मिळणार आहे, अर्थात त्यांची कहाणी पूर्ण होते की नाही हे चित्रपटातून लवकरच कळेल. (Timepass 3 Cast)

timepass 3 release date cast ravi jadhav hruta durgule prathamesh parab marathi movie music
'टाइमपास ३'च्या 'लव्हेबल' गाण्याची चाहत्यांना भुरळ, हृतावर लाइक्सचा पाऊस

'टाइमपास 3' मध्ये प्रेमाचा वेगळाच अध्याय समोर येणार आहे, म्हणजे आधी आपण काहीसा टपोरी असलेलं दगडू आणि सुशिक्षित, सभ्य घरातली प्राजक्ता यांची लव्हस्टोरी पाहिली. पण या तिसऱ्या भागात दगडूला त्याच्याहून वरतान असलेली, थेट जिचे वडिलच गुंड आहेत अशी पालवी भेटणार आहे. त्यामुळे प्राजक्ताच्या प्रेमात पडून सभ्यतेच्या वाटेवर निघालेला दगडू पालवी मुळे यूटर्न घेणार की नेमकं काय करणार हे या चित्रपटात दिसणार आहे.

timepass 3 release date cast ravi jadhav hruta durgule prathamesh parab marathi movie music
आईबाबा आणि साईबाबाची शप्पथ.. टाईमपास ३ च्या गाण्यानं उडवलाय धुरळा..

झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशनची निर्मिती असलेल्या आणि रवी जाधव (Ravi Jadhav) यांच्या दिग्दर्शनाने सजलेल्या या चित्रपटाच्या टिझरने आणि गाण्यांनी प्रेक्षकांना वेड लावलं आहे. आता चित्रपट कधी एकदा प्रदर्शित होतोय याची सगळे वाट पाहत आहेत. 'टाइमपास 3' मध्ये दगडू च्या भूमिकेत आपला लाडका प्रथमेश परब (Prathamesh Parab) आहे तर पालवीची भूमिका तरुणाईच्या 'दिल की धडकन' अशी ओळख असणाऱ्या हृता दुर्गुळे (Hruta Durgule) हिने साकारली आहे. विशेष म्हणजे आजवर कधीच न बघितलेल्या अवतारात हृता आपल्याला यात दिसणार आहे. आजवर हृताने साकारलेल्या भूमिकांच्या अगदी विरोधाभासी ही भूमिका आहे. तिची भाषा, तिचा डॅशिंग अंदाज पाहून चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे.

प्रथमेश आणि हृता व्यतिरिक्त चित्रपटात माधव लेले उर्फ शाकाल म्हणजेच वैभव मांगले, (vaibhav mangle) शांताराम परब म्हणजे भाऊ कदम (Bhau kadam), आरती वडगबाळकर, दगडू गॅंग आणि एका जबरदस्त भूमिकेत संजय नार्वेकर बघायला मिळणार आहेत. संजय नार्वेकर (sanjay narvekar) पालवीच्या वडिलांची भूमिका साकारणार आहेत, जे स्वतः गुंड आहेत. चित्रपटात एकूण पाच गाणी असून ती क्षितीज पटवर्धन यांनी लिहिली आहेत तर संगीत अमितराज यांचं आहे. या चित्रपटाच्या 'लव्हेबल' आणि 'साई तुझं लेकरू' या गाण्याला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. चित्रपटाची कथा रवी जाधव यांची असून प्रियदर्शन जाधव याने चित्रपटाची पटकथा आणि सवांद लिहिले आहेत. असा 'टाइमपास ३' हा धम्माल चित्रपट येत्या २९ जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com