आव्हानांना तोंड देत तिने केलं स्वतःला सिद्ध; 'गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल'चा ट्रेलर लॉन्च..

संतोष भिंगार्डे
रविवार, 2 ऑगस्ट 2020

भारतीय हवाई दलात राहून देशाची सेवा करणाऱ्या प्रथम महिला पायलट गुंजन सक्सेनाची कहाणी या चित्रपटात मांडण्यात आली आहे.

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावरील विविध पोस्ट्समधून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारा चित्रपट म्हणजे "गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल." या चित्रपटाचा ट्रेलर आता प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरची सुरुवात एक तरुण मुलगी (जान्हवी कपूर) पायलट होण्याचे स्वप्न पाहात आहे येथून होते. तिला तिच्या आई-वडिलांचा संपूर्ण पाठिंबा असतो. समाज किंवा आपल्या आजूबाजूचे लोक काय म्हणतील याची पर्वा न करता ती मुलगी आपल्या स्वप्नांचा पाठलाग करते आणि अखेर पायलट बनते. 

मुंबई पालिकेची मोठी कारवाई, माहिममधल्या 'या' रुग्णालयाची नोंदणी रद्द

या चित्रपटात, गुंजनला हवाई दलात ती महिला असल्यामुळे तिच्या नोकरीत भेदभावाचा सामना करावा लागतो. तिला अनेकदा सांगितले जाते की ती कमकुवत आहेस आणि संरक्षण सेवांमध्ये दुर्बल लोकांसाठी जागा नाही, पण जेव्हा तिला 1999 च्या कारगिल युद्धावर पाठवले जाते तेव्हा गुंजनच्या कारकीर्दीचा खरा प्रवास सुरू होतो.

कशेडी घाटात वाहनांची वाहतूक कोंडी; गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची कोकणाकडे धाव...

त्यानंतर 1999 च्या कारगिल युद्धाच्या वेळी ती अशी काही कामगिरी करते की अख्ख्या देशाला तिचा अभिमान वाटतो. भारतीय हवाई दलात राहून देशाची सेवा करणाऱ्या प्रथम महिला पायलट गुंजन सक्सेनाची कहाणी या चित्रपटात मांडण्यात आली आहे. शरण शर्मा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. जान्हवी कपूर यामध्ये गुंजन सक्सेनाची भूमिका साकारीत आहे. शिवाय अंगद बेदी, विनित कुमार, मानव वीज हे कलाकारांनीही या चित्रपटात काम केले आहे.
----
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: trailer of bollywood movie Gunjan saxena the kargil girl lauched