esakal | माझा फादर्स डे 29 डिसेंबरला; कोणी म्हटलंय असं... वाचा सविस्तर...
sakal

बोलून बातमी शोधा

rajesh khanna

आपल्या वडीलांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उद्या जगभरात फादर्स डे साजरा केला जाणार आहे. मात्र बॉलीवूड अभिनेत्री ट्विंकल खन्नाने मात्र आपण फादर्स डे 29 डिसेंबर रोजी साजरे करत असल्याचे म्हटले आहे.

माझा फादर्स डे 29 डिसेंबरला; कोणी म्हटलंय असं... वाचा सविस्तर...

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई : आपल्या वडीलांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उद्या जगभरात फादर्स डे साजरा केला जाणार आहे. मात्र बॉलीवूड अभिनेत्री ट्विंकल खन्नाने मात्र आपण फादर्स डे 29 डिसेंबर रोजी साजरे करत असल्याचे म्हटले आहे. दिवंगत अभिनेते राजेश खन्ना आणि अभिनेत्री व निर्माती ट्विंकल खन्ना ही जोडी हिंदी चित्रपटसृष्टीतील वडील आणि मुलीची बेस्ट जोडी मानली जाते. ट्विंकलचे आपल्या वडिलांवर खूप प्रेम होते. त्यांच्यामध्ये वडील आणि मुलीच्या नात्यापेक्षा मैत्रीचे नाते अधिक होते. ट्विंकल आपल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्या वडिलांबरोबर शेअर करीत होती. 

सौरव गांगुलीच्या कुटूंबापर्यंत पोहचला कोरोना; वाचा कोण कोण झाले बाधित...

आता उद्या (ता. 21) फादर्स डे आहे आणि त्यानिमित्त ट्विंकलला आपल्या वडिलांची खूप आठवण येत आहे. तिने आपल्या वडिलांबरोबरच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे  आणि काही आठवणींना उजाळा दिला आहे. राजेश खन्ना यांचा जन्मदिवस 29 डिसेंबर आणि ट्विंकल खन्नाचा जन्मदेखील 29 डिसेंबर 1973 रोजी झाला. त्यामुळे ट्विंकल खन्ना 29 डिसेंबर हाच फादर्स डे मानते आणि त्या दिवशी सेलिब्रेशन करते. 

सुशांतसिंग आत्महत्या प्रकरण : सुशांतसोबतचे कॉन्ट्रॅक्ट यश राज फिल्म्सने पोलिसांकडे केले सुपूर्त...

ती म्हणते, की माझ्या वडिलांवर माझे खूप प्रेम होते. मला त्यांची आठवण सतत येते. जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा माझे वडील माझ्या मम्मीला तू मला जगातील सगळ्यात मोठी गिफ्ट दिलीस. मला ते प्रेमाने टीना बाबा बोलायचे. मला त्यांनी खूप लाडाकोडात वाढविले. उद्या जरी फादर्स डे असला तरी माझ्यासाठी 29 डिसेंबर हाच फादर्स डे असतो.

अरे बापरे..! राज्यात कोरोनाचा धोका वाढणार ? गुजरात, राजस्थानातून महाराष्ट्रात अवैध प्रवासी वाहतूक...

राजेश खन्ना यांचे आपल्या दोन्ही मुलींवर (ट्विंकल आणि रिंकी) तितकेच प्रेम करीत होते. त्यांनी शक्ती सामंता यांना घेऊन जेव्हा 'अलग अलग' या चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा त्या चित्रपटाचा मुहूर्त त्यांनी ट्विंकल खन्नाच्या हस्ते केला. राजेश खन्ना यांना त्यांच्या वाढदिवशी अर्थात 29 डिसेंबर रोजी खूप पुष्पगुच्छ वगैरे यायचे. तेव्हा ट्विंकल लहान होती. राजेश खन्ना तिला हे पुष्पगुच्छ तुलाच आले आहेत..''तुझा आज वाढदिवस आहे ना..''असे सांगायचे.