esakal | कान्स महोत्सवासाठी सरकारतर्फे यंदा दोन प्रादेशिक चित्रपटांची निवड; मराठीतून 'या' चित्रपटाला संधी
sakal

बोलून बातमी शोधा

kannes film festival

भारत सरकारतर्फे कान्स चित्रपट महोत्सवासाठी माई घाट- क्राईम 103/2005 या मराठी चित्रपटाची व हॅल्लारो या गुजराती चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. हे चित्रपट कान्स मार्केट विभागात दाखविले जाणार आहेत.

कान्स महोत्सवासाठी सरकारतर्फे यंदा दोन प्रादेशिक चित्रपटांची निवड; मराठीतून 'या' चित्रपटाला संधी

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई :  सध्या कोरोनामुळे सगळे चित्रपट महोत्सव आणि पुरस्कार सोहळे पुढे ढकलण्यात आले आहेत. कान्स हा चित्रपट महोत्सव मे महिन्यात होणार होता. हिंदीतील काही कलाकारांनी फेब्रुवारी महिन्यातच तेथे जाण्याचा विचार व्यक्त केला होता. परंतु कोरोनामुळे त्यांनी आपला विचार रद्द केलाच शिवाय कान्स महोत्सवदेखील पुढे ढकलण्यात आला आणि आता तो ऑनलाईन पार पडत आहे. 

बापरे 'एवढे' रोईंगपटू दोषी...कुछ तो गडबड है..! वाचा सविस्तर...

भारत सरकारतर्फे कान्स चित्रपट महोत्सवासाठी माई घाट- क्राईम 103/2005 या मराठी चित्रपटाची व हॅल्लारो या गुजराती चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. हे चित्रपट कान्स मार्केट विभागात दाखविले जाणार आहेत. विशेष म्हणजे या वेळी सरकारने प्रादेशिक भाषेतील चित्रपटांना प्राधान्य दिले आहे हे विशेष. 

मोठी बातमी - मुंबईनंतर आता नवी मुंबईच्या आयुक्तांची तडकाफडकी बदली...

25 जून रोजी माई घाट...या चित्रपटाचा प्रीमियर होणार आहे. माई घाट हा चित्रपट अनंत महादेवन यांनी दिग्दर्शित केला आहे. एका सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे. अभिनेत्री उषा जाधवने यामध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. यापूर्वी या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. आता कान्ससाठी हा चित्रपट जातोय याचा नक्कीच आनंद आहे.  

...कायद्याचे उल्लंघन झाल्यास जबाबदारी तुमची; फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

इफ्फीचे पोस्टर लाँच
भारत सरकारतर्फे गोवा येथे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात आयोजन केले जाते. गेल्या वर्षी या महोत्सवाचा सुवर्ण महोत्सव मोठ्या थाटामाटात पार पडला. यंदाही नोव्हेंबर महिन्यातच हा महोत्सव होणार आहे. आज या महोत्सवाच्या पोस्टरचे आणि पुस्तिकेचे प्रकाशन माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले. नोव्हेबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 51 वा हा महोत्सव होणार आहे. देश-विदेशातील चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे.