Birthday Special : रंगीला गर्ल 'उर्मिला मातोडकरांना' सोशल मिडियातून शुभेच्छांचा वर्षाव....

Urmila Matondkar Social Mesia Birthday Special Marathi News
Urmila Matondkar Social Mesia Birthday Special Marathi News

कोल्हापूर : ' लकडी की काठी काठी पे घोडा '.......हे गाणं आज अनेक बालकांच्या तोंडून आपल्याला ऐकायला मिळते. अशा या गाण्याच्या  मासूम चित्रपटातून सुरुवात करून भारतीय चित्रपट सृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण करणारी आणि रंगीला सारख्या गाण्यातून युवकांना बेधुंद करणाऱ्या कलाकार रंगीला ऊर्मिला मातोडकर चा आज जन्मदिवस....

उर्मिला मातोंडकर हिचा जन्म 4 फेब्रुवारी 1974 ला मुंबई येथे झाला. मराठी भाषिक कुटुंबात जन्मलेल्या उर्मिलाने हिंदी चित्रपटात आपले नाव लौकिक केले.1980 सली झाकोळ या मराठी चित्रपटात सुरुवातीला तिने बालकलाकाराची भूमिका बजावली. तर याच वर्षी कलियुग या चित्रपटा मधून तिने हिंदी चित्रपटात पदार्पण केले. नरसिंहा, मासूम या चित्रपटातून तिच्या करिअरची खरी सुरुवात झाली. 

स्त्रियांचे भावविश्व वेगळ्या रुपात
1995 सालचा दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या रंगीला चित्रपटाने खर्‍या अर्थाने ती पुढे आली. आणि या चित्रपटामुळे तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला. रंगीला मधील आजही अनेक गाणी त्या काळातील तरुण असणाऱ्या अनेकांच्या मनात रेंगाळत आहेत. जुदाई, सत्या, भूत अशा अनेक चित्रपटात तिने काम केले. स्त्रियांचे भावविश्व एका वेगळ्या रुपाने त्यांनी चित्रपट सृष्टीत साकारले. तिने केवळ मराठी हिंदीच नाही तर मल्याळम, तेलुगू चित्रपटातही काम केले. आज ही ती चित्रपटसृष्टीतून जरी दूर असली तरी आपल्या सोशल मीडिया वरती अनेक फोटो ति अपलोड  करत असते. उर्मिलाने १०  वर्ष लहान असणाऱ्या कश्मीरी उद्योजक मोहसिन अख्तर बरोबर लग्न केले. 

उर्मिलाचा राजकिय प्रवास
पुढे जाऊन उर्मिला राजकारणात उतरली. आणि काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. 2019 मध्ये भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात मुंबई मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला.
 अशा या उर्मिलाचा प्रवास हा चित्रपट सृष्टी ते राजकारण असला तरीही आजही अनेक युवक-युवतींच्या मनावरती रंगीला गर्ल उर्मिला ची छाप अजूनही कायम आहे . तरुणाईसाठी वेगळे विश्व निर्माण करणाऱ्या  भारतीय चित्रपट सृष्टीतील एका नटखट आणि अवखळ अशी प्रतिमा असलेल्या उर्मिला मातोडकर आजही अनेक जण फिदा आहेत. त्यामुळेच सोशल मिडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com