Valentines Day 2023: 'माझी व्हॅलेंटाईन तूच..' म्हणत बिग बॉस फेम उत्कर्ष शिंदेनं शेअर केला 'तिचा' व्हिडीओ

सध्या उत्कर्ष शिंदेनं पोस्ट केलेल्या व्हॅलेंटाईन स्पेशल पोस्टची जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
Utkarsh Shinde
Utkarsh Shinde Instagram

Utkarsh Shinde: आज व्हॅलेंटाईन डे निमित्तानं सगळीकडेच प्रेमाचे वारे वाहताना दिसत आहेत. जो-तो गेल्या दोन दिवसांपासून व्हॅलेंटाईन स्पेशल पोस्ट करताना दिसत आहे. मग अगदी सर्वसामान्य नेटकरीच काय सेलिबही यामध्ये मागे राहिले नाहीत.

यासगळ्यामध्ये आता मराठी बिग बॉस फेम उत्कर्ष शिंदेची पोस्ट सोशल मीडियावर जोरदार गाजतेय. त्यानं आपल्या व्हॅलेंटाईनचा थेट व्हिडीओ पोस्ट केला आहे...चला जाणून घेऊया उत्कर्ष शिंदेच्या त्या व्हॅलेंटाईन स्पेशल पोस्टविषयी.(Valentines Day 2023 Utkarsh Shinde Post viral )

Utkarsh Shinde
Valentine Day 2023: 'आज आमच्या लग्नाचा 23 वा वाढदिवस..',दिवंगत पतीच्या आठवणीत मंदिरा बेदीची भावूक पोस्ट

उत्कर्ष शिंदे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय पहायला मिळतो. तो अनेकदा त्याच्या प्रवासा दरम्यानचे व्हिडीओ शेअर करताना दिसतो. आणि अर्थात त्याच्या अनेक पोस्ट या काही ना काही सामाजिक संदेश देताना दिसतात.

आता उत्कर्ष शिंदेची व्हॅलेंटाईन पोस्टही असाच एक सामाजिक संदेश देणारी आहे. ज्यात त्यानं व्हॅलेंटाईन म्हणजे फक्त एक मुलगा आणि मुलीचं प्रेमच असू शकत नाही तर त्या पलिकडे जाऊन समाजातील प्रत्येक जीव आपल्याला प्यारा असला पाहिजे. आपण त्या सगळ्यांप्रती कृतज्ञ असायला हवं असं म्हटलं आहे.

उत्कर्षनं एक व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्याला त्यानं कॅप्शन दिलं आहे की, “माझी व्हॅलेंटाईन तूच “ माझी हिरोईन “ आता उत्कर्षच्या आयुष्यातील ही हिरोईन...त्याची व्हॅलेंटाईन एक मांजरीचं पिल्लू आहे.

त्यानं पोस्ट करताना लिहिलं आहे की, ''7 दिवसाचा टूर प्रवास करून शूटिंग वरून घरी परतलो .सकाळी आमची कामवाली मावशी ओरडत अली साहेब लिफट कडे एक लहान मांजरीचं पिल्लू जखमी कुडकुडत पडलंय .

मी हातातला कॉफी मग तसाच घेऊन खाली उतरलो पाहतोय तर .4-5महिन्या पासून जे मांजरीचं पिल्लू वाढताना बघतोय हितर तीच होती “हिरोईन” .रस्त्यावरच्या कुत्र्यांनी तिच्या पाठीचे मानेचे लचके काढून एक पाय मोडून अर्ध मेली केलेली.तरीही आमची हिरोईन कशी बशी जीव वाचवत लिफ्ट कडे आली असावी .

Utkarsh Shinde
Valentine Day 2023:'उमेशचा एक फोनकॉल अन् ढसाढसा रडू लागली होती प्रिया..', 'बापट-कामत' प्रेमाची बातच काही और
Utkarsh Shinde
Akshay Kelkar: 'बेबी ऑन बोर्ड..' म्हणत अक्षय केळकरनं दिली Good News..चाहत्यांनी केला अभिनंदनाचा वर्षाव

.तिची अवस्था पाहताक्षणी घरातील रिकामा बॉक्स घेऊन हेरोईनला आत ठेवलं आणि थेट गाठलं प्राण्याचं हॉस्पिटल .डॉ गोरे सर तातडीने सर्व कामे सोडून लगबगीने”हिरोईन “च्या जखमा बघूलागले.

जखमा इतक्या खोल कि मनका,आतड्या दिसत होत्या.आणि माझा एकाच तगादा डॉक्टर हि वाचेल ना ? सर म्हणाले “वाचणार नसती तर तुम्हाला भेटलीच नसती “जस माणसांची ट्रीटमेंट करत आलो तसंच सरांची मदत करत पटापट मग जखमा स्वछ करण्यास मदत करू लागलो,

आमची हेरॉईन इतकी वेदनेत होती कि तिनें डॉक्टरांच्या बोटांचा चावा घेतला .रक्तबंबाळ होऊन वेदना होत असताना देखील डॉक्टर गोरी सर त्याच मायेने हिरोईन वर उपचार करत होते.तिला भूल दिली आणि आम्ही जखमा स्वछ करून टाके लावून,तिचा पाय पाहिला तर फ्रॅक्चर आहे कळालं .प्लास्टर कास्ट करत पाय नीट करायला घेतला .

तिच्या लहानग्या जीवाला इतक सगळं सहन तरी कस होत असेल ?हे शब्दात सांगताच येणार नाही .डॉ गोरे सर म्हणाले हिला काही तास ठेवू आणि नंतर घेऊन जा.होईल बरी ती वाचेल तिचा जीव.अखेरीस धीर मिळाला .

पण मग तिला बेशुद्ध अवस्थेत घेऊन बसलेलो असताना मनात कैक विचार दाटून आले .माणसाने माणसाशी प्रेम करावे हे ब्रीद वाक्य खरं ?ज्यात फक्त माणसाशीच किंवा आपल्या जोडी दाराशी ,आपल्या नातेवाईकांशी आई वडिलांशी मुला बाळांशी ,मित्रांशीच प्रेम करावे का ?कि माणसाने सर्वांशीच निस्वार्थी प्रेम करावा ? निसर्गात असणाऱ्या प्रत्येक जीव जंतूशी प्रेम करावे.

मग ते वृक्ष असो ,मुके प्राणीमात्र असो कि कोणीही गरजू असो. व्हॅलेंटाईन फक्त प्रियकर प्रियासी चा दिवस नसून तो प्रेमाचा दिवस आहे .आणि प्रेम हे सर्वां वर करायचे असते .हे लक्षात असूद्या तुमच प्रेम-माया -थोडीशी मदत किंवा तुमचा वेळ कोणाचा तरी जीव वाचवू शकतो .प्रेमात जीव देण्या पेक्षा सर्व जीवाना प्रेम द्या .हॅप्पी वॅलेंटिने .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com